महाराष्ट्र
युवराज राठोड यांचा डीसीसी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे जिल्ह्याच्या सहकार व राजकीय क्षेत्रात चर्चेला सुरुवात झाली आहे.
युवराज राठोड हे गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आधार हॉस्पिटलच्या माध्यमातून ते गोरगरीब रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी वेळोवेळी विविध आंदोलने केली आहेत.
पोलीस ठाणे, रुग्णालय, वीज वितरण मंडळ यांसह विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असतात.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यांना वेळेवर पीककर्ज व इतर आर्थिक सुविधा मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे राठोड यांनी सांगितले.
'मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अदृश्य शक्तीने आदेश दिला,' असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघातून एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, युवराज राठोड यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा