महाराष्ट्र
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एम. के. फाउंडेशनचा माणुसकीचा दीपोत्सव! बहुरूपी नगरसह शहर व ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी, कष्टकरी आणि गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने एम. के. फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी शिधा किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. विजापूर रोडवरील बहुरूपी नगर येथे गरजू कुटुंबांना शिधा किटचे वाटप करण्यात आले. यासोबतच सोलापूर शहरातील विविध भागांसह ग्रामीण परिसरातही गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली. एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा आणि त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
बहुरूपी नगर येथे झालेल्या शिधा किट वाटपप्रसंगी मल्लेश सूर्यवंशी, बसवराज सितारे, सुभाष सितारे, कल्लाप्पा तेले यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. तसेच एम. के. फाउंडेशन परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी महादेव कोगनुरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत अडचणीच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी असल्याचे सांगितले. समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिवाळीचा आनंद केवळ स्वतःच्या घरापुरता मर्यादित न ठेवता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न एम. के. फाउंडेशनने या उपक्रमातून केला. शहरासह ग्रामीण भागातही शिधा किटचे वाटप केल्याने अनेक गरजू कुटुंबांना सणाच्या काळात दिलासा मिळाला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा