जामनेर तालुक्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; रांजणी गावावर शोककळा!
शेतात काम करत असताना सर्पदंश; जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी केले मृत घोषित
जामनेर : जामनेर तालुक्यातील रांजणी येथील शेतकरी जेवरीलाल मांगीलाल तेली यांचा आज दुपारी सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे रांजणी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेवरीलाल मांगीलाल तेली हे आज दुपारी आपल्या शेतात असताना त्यांना सर्पदंश झाला. ही घटना लक्षात येताच गावातील सरपंच व ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांना तातडीने जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या कठीण प्रसंगी गावातील सरपंच व ग्रामस्थांनी रुग्णालयात नेताना केलेले सहकार्य मोलाचे ठरले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
शेतात काम करताना सर्पदंशासारख्या दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
या दुर्दैवी घटनेने रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा