अंत्रोळीत ‘मिल्की मिस्ट’ दूध संकलन व शितकरण केंद्राचा दिमाखात शुभारंभ... दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या उपक्रमाची सुरुवात; दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार हक्काची सुविधा - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळीत ‘मिल्की मिस्ट’ दूध संकलन व शितकरण केंद्राचा दिमाखात शुभारंभ... दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या उपक्रमाची सुरुवात; दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार हक्काची सुविधा


समीर शेख प्रतिनिधी 
अंत्रोळी : अंत्रोळी येथे ‘मिल्की मिस्ट’ दूध संकलन व शीतकरण केंद्राचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर २०२६) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न झाला. या केंद्राची सुरुवात अजय कर्वे व शुभम भोसले यांनी केली आहे.
        या केंद्राच्या माध्यमातून अंत्रोळी व परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध संकलन करण्यात येणार असून, त्यासाठी शीतकरणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर दूध संकलनाची व्यवस्था निर्माण झाल्याने परिसरातील दूध उत्पादकांना त्याचा उपयोग होणार आहे.
     या उद्घाटन सोहळ्यास सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी (ताई) महेश देवकर, युवा प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, युवा उद्योजक रमेश (आण्णा) आसबे, माजी पंचायत समिती सदस्य मळसिद्ध शिवानंद मुंगळे, सिताराम शुगरचे चेअरमन शिवाजीराव बाजीराव काळुंके व तसेच ब्रम्हदेव सलगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
    तसेच मिल्की मिस्टचे असिस्टंट मॅनेजर (मिल्क प्रोक्युरमेंट) ऋषिकेश सरक यांची उपस्थिती होती.
     या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संकलन व शीतकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. अजय कर्वे व शुभम भोसले यांनी या व्यवसायाची सुरुवात केली असून, स्थानिक दुग्धव्यवसायाच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
      कार्यक्रमासाठी मिल्की मिस्ट परिवार, अंत्रोळीतील दूध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ व मित्रमंडळी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads