परिवर्तनाच्या लाटेत दिलीप खोडपे सरांना मिळतोय प्रचंड प्रतिसाद....
जामनेर विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची नांदी ठरलेल्या दिलीप खोडपे सर यांच्या प्रचार दौऱ्याला ठिकठिकाणी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी, गोरगरीब आणि सामान्य जनतेने खोडपे सरांच्या प्रचारासाठी स्वखुशीने वर्गणी गोळा करून त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेतही जनतेचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता. प्रत्येक गाव, वाडी-वस्ती, पाड्यावर खोडपे सरांसाठी उभारलेले स्वागत आणि पाठिंबा हे परिवर्तनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल असल्याचे दिसून येत आहे. जनतेने या निवडणुकीत स्वतःहून पुढाकार घेतला असून, निवडणूक जनतेने आपल्या हाती घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या व्यापक जनसमर्थनामुळे जामनेर मतदारसंघात परिवर्तनाची विजयी तुतारी वाजणार, याची खात्री पटत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा