जळगाव जिल्ह्यात येत्या २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाचा यलो अलर्ट ! नागरिकांना सतर्कतेचा इशारा.. - दैनिक शिवस्वराज्य

जळगाव जिल्ह्यात येत्या २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाचा यलो अलर्ट ! नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 जळगाव दि. 26  भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या ईशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यात येत्या २७ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तसेच दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक २७ डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह वादळीवारा आणि गारपीटीसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  दरम्यान जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कृतीशिल उपाययोजना कराव्यात. हवामानाबाबत अधिकृत अपडेट्सद्वारे माहिती घ्यावी, आपत्तीत मदतीची गरज भासल्यास जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात टोल फ्री १०७७ किंवा ०२५७-२२१७१९३ किंवा ०२५७-२२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads