पुणे पदवीधरसाठी भाजपाकडून उमेश पाटील इच्छूक - दैनिक शिवस्वराज्य

पुणे पदवीधरसाठी भाजपाकडून उमेश पाटील इच्छूक


सांगली जिल्हा प्रतिनिधी/ सुरज म्हेत्रे :-
पुणे पदवीधर निवडणुकीसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश पाटील हे भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत.
उमेश पाटील हे आमदार सुरेश खाडे व खासदार संजयकाका पाटील यांचे विश्वासू मानले जातात.
उमेश पाटील यांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी मिरज समर्थक कार्यकर्त्यांकडून होत आहे.गेल्या दशकापासून मिरज पंचायत समिती, जिल्हा परिषद सांगली, विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये उमेश पाटील यांचे भाजपा पक्षासाठीचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads