राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची पहिली बैठक विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात उत्साहात संपन्न
प्रतिनिधी/ परमेश्वर सावंत :-
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची पहिली बैठक विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात उत्साहात संपन्न झाली. प्रदेश अध्यक्ष इंजी. वैभव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश महिला संघटक सुलभा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे विभागीय कार्याध्यक्ष राजे गिरीशजी घोरपडे यांच्या महालात बैठक पार पडली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सैनिक म्हणुन संताजी घोरपडे व धनाजी घोरपडे यांची इतिहासात नोंद आहे. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे प्रमुख निष्ठावंत सहकारी म्हणुन गिरीशजी घोरपडे यांची नोंद होईल यात शंका नाही, असे गौरवोद्गार राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी बैठकीस विडिओ कॉलच्या माध्यमाने संबोधणं करताना केले .
प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव रमेश देसाई, महिला प्रदेश अध्यक्षा सुजाता गुरव, सुभाष परदेशी,हेमलता परदेशी, संतोष परदेशी, प्रज्ञा कांबळे, नंदकुमार बोळे, सुनील परदेशी, गणेश जाधव, ऍड .वीरेंद्रसिंह ठाकूर, सुरेंद्र ठाकूर कामगार संघाचे अध्यक्ष धीरज महांगरे , उपाध्यक्ष श्रीराम परदेशी, सचिव कैलास किटुकले हे प्रत्यक्ष व मुख्य संघटक श्री विलास सुतार हे कॉन्फरन्सवर उपस्थित होते. यावेळी २०२१ मध्ये संघ वाढीसाठी घेण्यात येणार्या उपक्रमा बाबत चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन रमेश देसाई यांनी केले,तर आभार श्रीराम परदेशी यांनी मानले. यावेळी विश्वग्रामी पत्रकार संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा