गुणवंत व गरजू विद्यार्थिनीला दिला मदतीचा हात : मराठा सेवा संघाचा कौतुकास्पद उपक्रम
बोरी येथून जवळच असलेल्या बोर्डी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश मिळवल्याबद्दल जिंतूर येथील मराठा सेवा संघ व डॉ. सुरेश खापरे यांच्या वतीने पालकांसह सन्मान करून तीला आर्थिक मदत करण्यात आली.
जिंतूर येथील मराठा सेवा संघाच्या वतीने बोरी येथील डॉ. सुरेश खापरे यांच्या निवासस्थानी वैष्णवी केशवराव कदम या विद्यार्थिनीचा वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उज्वल यश मिळाल्याबद्दल तिचे पालक केशवराव कदम व किरण कंठाळे यांच्यासह सन्मान करण्यात आला तसेच सदर विद्यार्थिनीला मराठा सेवा संघाच्या वतीने तालुकाप्रमुख प्रभाकर लिखे यांच्या हस्ते ११ हजार रुपये तर डॉ. सुरेश खापरे यांच्या वतीने ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
याप्रसंगी सेवा संघाचे तालुकाप्रमुख प्रभाकर लिखे, उपतालुकाप्रमुख सुभाष चोपडे, डॉ. सुरेश खापरे, गजानन चौधरी, सुभाष मस्के, अनिल मेटांगळे, सुभाष ताठे, डिगांबर तळेकर, सुरेश तावडे, सुरेश तळेकर, ज्ञानेश्वर भोंबे, राजेंद आदि उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा