मिरजेतील 'बँक ऑफ बडोदाची' १७ कोटींची केली फसवणूक - दैनिक शिवस्वराज्य

मिरजेतील 'बँक ऑफ बडोदाची' १७ कोटींची केली फसवणूक

सांगली जिल्हा प्रतिनिधी/ सुरज म्हेत्रे :-
कर्जासाठी तारण ठेवलेल्या मालाची परस्पर विक्री करून मुंबईतील एका कंपनीने मिरजेतील बँक ऑफ बडोदाची 16 कोटी 97 लाखाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिसात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याप्रकरणी बँक मॅनेजर जगदीश नामदेवराव पाटील यांनी निरुपमा पेंडुरकर (नरीमन पॉईंट, मुंबई), अजित नारायण जाधव (सांगली), प्रदुम्न बाळागोंडा पाटील (वसगडे, ता. तासगाव), राहुल दिनेश मितल, मिरा दिनेश मित्तल (दोघे रा. माधवनगर बायपास, सांगली), दिपक मधुकर गुरव (रा. कवठेएकंद, ता. तासगाव), गणेश सोपान पवार (रा. तानंग, ता. मिरज) आणि प्रशांत प्रकाश निकम (रा. चिंचणी रोड, तासगाव) या आठ जणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads