पार्सल डिलिव्हरी बॉय यांचा मनमानी कारभार
प्रतिनिधी / आकाश बारड :-
ऑनलाइन वस्तू विकणाऱ्या अमेझॉन सारख्या साईटवरून आपणास घरपोच वस्तू पोहचवण्याची हमी दिली जाते.
आपल्या पोस्टल पिनकोडवर ती सुविधा उपलब्ध देखील असते, तरीदेखील आपल्या परिसरात काहीं ठिकाणी पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या delhivery.com(राशिवडे) व ecom express (गारगोटी) या कंपनीचे डिलिव्हरी बॉय बारडवाडी, चक्रेश्वरवाडी, जोगेवाडी, कुऱ्हाडवाडी व तळाशी गावातील लोकांना पार्सल घेण्यासाठी तळाशी फाटा या ठिकाणी बोलवतात, व एखाद्या व्यक्तीने घरपोच डिलिव्हरी साठी आग्रह धरल्यास त्याचे पार्सल परत पाठविले जाते.
कंपनी कडून घरपोच वस्तू पोहचवण्याची हमी दिली जाते, पण पार्सल डिलिव्हरी बॉय मनमानी कारभार करत ते पार्सल परत पाठवतात .
ह्या सर्व गोष्टींना वेळीच लक्षात घेऊन delhivery.com(राशिवडे) व ecom express (गारगोटी) यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा सदर डिलिव्हरी कंपनी वरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी घालण्यात यावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर,तहसिलदार राधानगरी व तहसिलदार भुदरगड यांचेकडे करण्यात येईल व डिलिव्हरी बॉयना भागात फिरू दिले जाणार नाही असा इशारा पंचक्रोशीतील ग्राहकांकडून दिला जात आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा