राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशनला नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनायक जाधव रूजू - दैनिक शिवस्वराज्य

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशनला नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनायक जाधव रूजू


यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / संजय कारवटकर :-
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशनला नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनायक जाधव सोमवारला रूजू झाले .
पोलीस निरीक्षक प्रशांत गिते यांची बदली अमरावती ग्रामीण येथे झाली असल्याने दिग्रस येथुन विनायक जाधव वडकीला आले आहेत. पोलीस निरीक्षक प्रशांत गिते  यांनी वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बावन गावामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण केले होते ,त्याच प्रमाणे मि सुध्दा कायदा सुव्यवस्था व्यवथीत व सलोख्याचे वातावरण निर्माण करीण असे नवनियुक्त पोलीस निरीक्षक साहेब विनायक जाधव यांनी सांगितले.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads