अतिक्रमित व्यावसायिकांना कायम करा ; तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / संजय कारवटकर
राळेगाव शहरातील छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्याबाबत नुकतीच राळेगाव नगरपंचायतीने नोटीस देऊन कारवाई करण्याचे संकेत दिले, त्यामुळे जनहित लक्षात घेता राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन देऊन अतिक्रमण काढू नये व अतिक्रमण नियमानुकूल करून कायम ठेवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अनेक व्यवसायिकांच्या उपस्थितीत देण्यात आले.
मागील नऊ महिन्यांपासून व्यवसाय करणारा छोटा व्यवसायिक गरीब दुर्बल घटक बेरोजगार आहे आणि त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले होते अशा परिस्थितीत केवळ मागील एक महिन्यापासून छोटा व्यावसायिक कसा बसा व्यवसाय करायला लागला आहे. अशावेळी जर त्यांचे अतिक्रमण काढले तर कुटुंबावर मोठे संकट आल्या शिवाय राहणार नाही. आज सर्वजण कोरोना महामारी मुळे त्रासलेले आहेत, अशा परिस्थितीत इतर सर्व काम सोडून नगरपंचायतीने या बाबीकडे लक्ष देण्याची विशेष गरज नव्हती.
छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हे काही राळेगाव शहराच्या विकासासाठी अडथळा नाही. त्यामुळे त्या लोकांना कायम करण्यात यावे व त्यांचा व्यवसाय करून त्यांना कुटुंब चालविता यावे यासाठी बळ देण्यात यावे.
असे निवेदन राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ऍड फिडेल बायदाणी यांच्या नेतृत्त्वात देण्यात आले या प्रसंगी शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे, तालुका उपाध्यक्ष वसंत पोटफोडे, मुर्तुझा बब्बर, गिरिधर ससनकर, किसनाजी देशमुख, रऊफ शेख, युसुफ अली सय्यद, राहूल ठाकरे, तेजस ठाकरे, रोशन धनालकोटवार, नशीब शेख, प्रवीण बनसोड, शकील भाई, अनील फरकाडे, गुणवंत ठूने, कमलेश गुजरकर, हनुमान पोटफोडे, विजय किन्नाके, व यांच्यासह राळेगाव शहरातील अनेक व्यावसायिक हजर होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा