पळसोना येथे ०५ लक्ष रुपयांच्या सि. सि. रोड चे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा लोकप्रिय आ.संतोषराव बांगर यांच्या हस्ते उद्घाटन - दैनिक शिवस्वराज्य

पळसोना येथे ०५ लक्ष रुपयांच्या सि. सि. रोड चे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा लोकप्रिय आ.संतोषराव बांगर यांच्या हस्ते उद्घाटन


तालुका प्रतिनिधी/ जगदीश काचगुंडे :-
कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील पळसोना येथे आमदार निधीतून पाच लक्ष रुपयांच्या सीसी रोड बांधकामाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. 
 सदैव आपल्या पाठीशी असलेला आपला नेता निवडणुकीच्या नंतर आपला लाडका नेता पहिल्यांदा गावात आल्याबद्दल गावकऱ्यांनी बँड व फटाक्यांच्या अतिषबाजी मध्ये मोठा जल्लोषात आनंदी उत्साहाने स्वागत केले. व आमदार संतोषराव बांगर साहेब यांनीदेखील ज्येष्ठ मंडळींचे युवक गावकऱ्यांचे माता भगिनींचे मतदान केलेल्या मतदारांचे शतशः आभार मानले. व उपस्थित माता-भगीनीच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी या कार्यक्रमास सोबत रामभाऊ कदम कानबाराव गरड नारायण मामा इंगळे शंकरराव लोथे दशरथराव घोंगडे नानाराव वडकुते दत्‍तराव जाधव रामचंद्र पवार गोपीचंद राठोड प्रकाश राठोड दुधीराम पवार सुरेश राठोड मधुकर लिंबेकर सिकंदर कुरेशी विठ्ठलराव नरोटे शिवाजीराव मस्के दत्तराव लोखंडे भाऊराव डाखोरे मनोहर चव्हाण कृष्ण राठोड बन्सी पवार ज्ञानबाराव मस्के उल्हास राठोड गजानन राठोड दत्तराव खंदारे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी युवक बांधव व माता भगिनी उपस्थित होत्या.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads