गुंज गावातील अविनाश जाधव यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

गुंज गावातील अविनाश जाधव यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न


प्रतिनिधी / ज्ञानेश्वर खाडे :-
गुंज गावातील अविनाश जाधव यांची भारतीय  सैन्य दलात मध्ये निवड झाली आहे .ते देशसेवा बजावण्यासाठी  5 डिसेंबर रोजी  जाणार आहेत. ही आनंदायी वार्ता सर्वांनसाठी स्वाभीमानाची ठरली. त्याच बरोबर नवयुवकांच्या मनात चैतन्याची पालवी निर्माण करणारी ठरली. त्यानिमित्ताने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
 या कार्यक्रमाला कुंभार पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस .बी. कापुरे साहेब ,पोलीस कॉन्स्टेबल व्हि.आर.केंद्रे  ,पोलीस पाटील  मोरेश्वर शेळके यांची उपस्थिती होती.  यावेळी कापुरे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन विजयानंद शेळके, ज्ञानेश्वर  खाडे, अतुल काजळे, गणेश काळे, गोविंद गोरे,दिपक कानडे, कृष्णा रोमन यांनी केले होते .या कार्यक्रमाला गावातील युवक तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads