ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण 2 फेब्रुवारी तर महिला आरक्षण 4 फेब्रुवारीला
संजय कारवटकर / यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
आता सरपंच पदाचा तिडा सुटला असे वाटायला लागला आहे येत्या 2 फेब्रुवारी ला यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच आरक्षणाची सोडत तालुकास्तरावर काढली जाणार आहे. तर 4 फेब्रुवारी ला जिल्ह्याधिकारी कार्यालयात महिला आरक्षण काढले जाणार आहे. त्यामुळे शिगेला पोहचलेल्या आरक्षणाची उतंकढा आता समाधानात परावर्तित होणार आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र ग्रामपंचायत. सरपंच उपसरपंच नियम 1964 च्या अनुषंगाने 5 मार्च 2020 रोजी राज्यस्तरीय सरपंच आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले होते. काही जिल्ह्यात निवडणूक पुर्व सरपंच आरक्षण सोडत पार पडली होती.
तसेच उर्वरित जिल्ह्यातील सरपंच आरक्षण 11 डिसेंबरच्या पत्रकानुसार निवडणूक कार्यक्रमानंतर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र कोरोणामुळे मार्च ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत आटोपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा प्रसंग ओढवला होता कोरोणाची रूग्ण संख्या कमी झाल्याने राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया आटोपली मात्र पुर्वी जाहीर झालेल्या सरपंच आरक्षण रद्द झाल्याने नव्याने आरक्षण कधी काढले जाणार याकडे नवनिर्वाचित सदस्याच्या नजरा लागल्या होत्या निवडणूक आयोगाने जिल्ह्याधिकारी यांच्या कडे सरपंच आरक्षण सोडती सदभात प्रस्ताव दाखल केला त्यामध्ये जिल्ह्याधिकारी यांनी 2 फेब्रुवारी ला जिल्ह्यातील सोळाही तहसील स्तरावर आरक्षण सोडत काढण्यचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, तर 4 फेब्रुवारी ला महिला आरक्षण जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या बचत भवन यवतमाळ येथे निघणार आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा