आरग ग्रामदैवत श्री यल्लमा देवीची यात्रा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच रद्द - दैनिक शिवस्वराज्य

आरग ग्रामदैवत श्री यल्लमा देवीची यात्रा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच रद्द


सुरज म्हेत्रे / सांगली जिल्हा प्रतिनिधी
आरग ग्रामदैवत श्री यल्लमा देवीची यात्रा कोरोणा च्या पार्श्वभूमीवर प्रथमच रद्द करण्यात आली.
आरग येथील यल्लम्मा देवीची यात्रा लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली आहे. २५ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रम होणार होते. कोरोना व लॉकडाऊनमुळे यात्रा भरविण्यास निर्बंध आले आहेत,  त्यामुळे  ग्रामपंचायतीने यावर्षी सर्व जाहीर कार्यक्रम रद्द केले आहेत. देवीचे सर्व धार्मिक व पारंपारिक विधी मात्र मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडले जाणार आहेत. २५ रोजी बोनी, २६ रोजी नैवेद्य व २७ रोजी किचाचा विधी होईल.
 प्रसादाची दुकाने, मनोरंजनाचे व्यवसाय, खाद्यपदार्थ इत्यादी व्यवसायांना परवानगी दिली जाणार नाही. यात्रेसाठी भाविकांनी गर्दी न करण्याचे तसेच कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन ग्रामपंचायत, पुजारी वर्ग व यात्रा समितीने केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads