राष्ट्रवादी युवती काँग्रेस राज्य उपाध्यक्ष मनिषाताई काटे यांची झरी विश्राम गृह येथे बैठक - दैनिक शिवस्वराज्य

राष्ट्रवादी युवती काँग्रेस राज्य उपाध्यक्ष मनिषाताई काटे यांची झरी विश्राम गृह येथे बैठक


संजय कारवटकर / यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
झरी (जा) तालुक्यातील आदिवासी बहुल तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य उप्याध्यक्ष यांची दिनांक 23 जानेवारी 2021 ला दू. 2.00 वाजता बैठक घेण्यात आली असून तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुका कार्यकारणी साठी आयोजित बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
सुप्रियाताई सुळे ( खासदार,बारामती ) यांनी 2012 मध्ये महिलांच्या न्याय व हक्कासाठी,एक राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व तरुणींना राजकारणामध्ये सक्रिय सहभागासाठी त्या उद्देशाने राष्ट्रवादी युवती काँग्रसची स्थापना करण्यात आली होती.त्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्ष मनीषा काटे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रसच्या बांधनीसाठी विश्राम गृह झरी येथे  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुरेखा ताई भेळे,जिजा मिरारकर,आरती सिडाम,शिवानी निखाडे,संजीवनी भोमकटीवार,शफी शेख,गणेश सोयाम,दिनेश सोयाम,प्रभाकर कुमरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads