भाजपा करमाळा तालुका कार्यकारणी जाहीर - दैनिक शिवस्वराज्य

भाजपा करमाळा तालुका कार्यकारणी जाहीर



तालुका प्रतिनिधी/अंगद भांडवलकर
              करमाळा तालुका भाजपा कार्यकारणी पदाधिकार्‍यांच्या निवडी हार,फेटा, श्रीफळ व निवडीचे पत्र देऊन तालुकाध्यक्ष गणेश चिवटे,जिल्हा सरचिटणीस किरण बोकण,भाजपा विस्तारक भगवान गिरीगोसावी, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार यांच्या हस्ते सत्कार करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
       या निवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा तालुका संपर्क कार्यालय, गायकवाड चौक येथे शुक्रवार दि.५/३/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. करण्यात आले.यावेळी तालुका सरचिटणीसपदी काकासाहेब सरडे (करंजे),सुहास घोलप(करमाळा),धनंजय ताकमाेगे (केम),अमरजित साळुंखे (सातोली), तालुका उपाध्यक्षपदी रामभाऊ ढाणे  (करमाळा),मच्छिंद्र हाके (मिरगव्हाण),दादासाहेब देवकर (वरकटणे),सचिन राऊत(घोटी), डाॅ.अभिजीत मुरूमकर (बिटरगाव श्री),संभाजी शिंदे (सावडी), दत्तात्रय पोटे (शेलगाव वां.), तालुका चिटणीसपदी सौ.चंपावती कांबळे (करमाळा),आजिनाथ सुरवसे (भोसे), अमोल जरांडे (केतुर), अशोक ढेरे (वीट), किरण वाळुंजकर (तरडगाव), संदीप सरडे (चिखलठाण), तालुका  कोषाध्यक्षपदी बंडू माने(कंदर), करमाळा तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत विश्वास काळे पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी सचिन गायकवाड (देवळाली), किसान मोर्चा तालुका अध्यक्षपदी विजय नागवडे (रायगाव), महिला तालुकाध्यक्षपदी सौ.भाग्यश्री कुलकर्णी (गौंडरे), ओ.बी.सी मोर्चा तालुका अध्यक्षपदी धर्मराज नाळे (मोरवड),अनुसूचित मोर्चा तालुकाध्यक्ष पदी वैजनाथ पिंटू भगत (कंदर),अल्पसंख्यांक मोर्चा तालुका अध्यक्षपदी मस्तान कुरेशी (करमाळा), कामगार आघाडी तालुकाध्यक्षपदी अशोक मोरे (रोशेवाडी),उद्योग आघाडी तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब होसिंग (देवीचामाळ),व्यापार आघाडी तालुकाध्यक्षपदी लखन ठोंबरे (करमाळा),भटके-विमुक्त आघाडी तालुकाध्यक्षपदी लखन चिरके (आवाटी),कायदा सेल तालुकाध्यक्षपदी शेखर घाडगे (तरडगाव),सहकार सेल तालुकाध्यक्ष मोहन शेंडे (घोटी),माजी सैनिक तालुकाध्यक्ष महादेव जानभरे (जिंती), अध्यात्मिक सेल तालुकाध्यक्षपदी ह.भ.प.प्रदीप ढेरे(वीट),ज्येष्ठ नागरिक सेल तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड (करमाळा),दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष शिवाजी मोरे (वांगी२),प्रज्ञा सेल तालुकाध्यक्ष प्रवीण बिनवडे (वंजारवाडी),शिक्षक सेल तालुकाध्यक्ष अशोक ढवळे (देलवडी),सांस्कृतिक सेल तालुकाध्यक्ष निलेश भुसारे (करमाळा),आदी जणांच्या निवडी करण्यात आल्या.
       यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून पक्ष बळकट करण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचून काम करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी प्रस्तावना जिल्हा सरचिटणीस किरण बोकन यांनी केली.बाळासाहेब कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विस्तारक भगवान गिरी गोसावी यांनी पार्टीचा उगम व रूपरेषा मांडली व आगामी काळात येणाऱ्या आव्हानांना धैर्याने तोंड देण्याची संकल्पना कार्यकर्त्यांसमोर मांडली. आभार रामभाऊ ढाणे यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads