पुण्यात लॉकडाऊन नाही, लसीकरण वाढवण्यावर भर ? - दैनिक शिवस्वराज्य

पुण्यात लॉकडाऊन नाही, लसीकरण वाढवण्यावर भर ?


पुण्यातील सर्व जनतेचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीकडे आणि लॉकडाऊन बाबतच्या घोषणेकडे लक्ष लागलेले आहे. मात्र, पुण्यात लॉकडाऊन होणार नसून, लसीकरण वाढवण्यावर भर देणार असल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तूर्त तरी लॉकडाऊनचा धोका टळला असल्याचे संकेत आहेत.


जागतिक स्वमग्नता दिन : मोबाईल देतोय 'स्वमग्नते'ला आमंत्रण!


पुण्यात रुग्णसंख्या वाढत असून लॉकडाऊन होणार याबाबत सध्या सर्वसामान्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यामुळे अनेकांनी लॉकडाऊनच्या भितीने गावजवळ केले आहे.


पण, लॉकडाऊन होण्याच्या भितीने सर्वसामान्य भयाच्या सावटा खाली आहेत.


ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्याच्या सल्ल्याची गरज नाही


आरोग्य विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात लॉकडाऊन होणार नसून लसीकरण वाढवण्यावर अधिक भर देणार आहे. तसेच सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने आपोआप गर्दीही कमी होत आहे. यामुळे रुग्णसंख्या ही आटोक्यात येईल. त्यामुळे लॉकडाऊन ऐवजी काही निर्बंध घालण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads