पाणी वाचवणाऱ्या शेतकरी पुत्राच्या समर्थनार्थ आम्ही मैदानात; करमाळयातील महिलांकडुन अतुल खुपसे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक - दैनिक शिवस्वराज्य

पाणी वाचवणाऱ्या शेतकरी पुत्राच्या समर्थनार्थ आम्ही मैदानात; करमाळयातील महिलांकडुन अतुल खुपसे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक



करमाळा/प्रतिनिधी
          उजनी जलाशयाच्या पाण्यावर डल्ला मारुन शेतकरी देशोधडीला लावणाऱ्या पालकमंत्र्याच्या पुतळ्याला पाण्यात बुडविले म्हणून शेतकऱ्यांचे नेते अतुल खुपसे पाटील यांच्या प्रतिमेला
भ्रष्टवादी पक्षाच्या नेत्यांचे हात लागले आहेत. मुळात तुम्ही एका पाणीचोराचं समर्थन करताय अन् आम्ही एका पाणी वाचविणार्या शेतकऱ्यांच्या पोराचं त्यामुळे भविष्यात आमचा लढा आणखीन तीव्र होणार असे सांगून शेतकरी महिलांनी उजनीचे पाच टीएमसी पाणी पळविणाऱ्या दत्तात्रय भरणे यांचा निषेध करत शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी  करमाळा तालुक्यातील केत्तुर येथे अतुल खूपसे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून पवित्र करण्यात आले.
          याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला वळवले असल्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्याने इंदापूर तालुक्यात जल्लोष करण्यात आला. मात्र सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली असून यामध्ये शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. दरम्यान अशी बातमी मिळताच उजनी जलाशयांमध्ये शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढून तो पुतळा उजनी जलाशयात बुडवून निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी बचाव संघर्ष समितीची चळवळीची ठिणगी पेटली. दरम्यान आज इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. इकडे लगेचच करमाळा तालुक्यामध्ये खूपसे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून प्रतिमा स्वच्छ करण्यात आली.
       यावेळी दिपाली डेरे, विमल साळुंके, सुवर्णा गुळवे, मनीषा साळुंके, हर्षदा डेरे आदी उपस्थित होत्या.

दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads