गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गल्लीमध्ये ग्रामपंचायती मार्फत लस द्यावी; भिमदलची संघटनेची मागणी - दैनिक शिवस्वराज्य

गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गल्लीमध्ये ग्रामपंचायती मार्फत लस द्यावी; भिमदलची संघटनेची मागणी



करमाळा प्रतिनिधी
      सध्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रभाव बघून सर्वांनचे गुडघे टेकले आहेत. यामध्ये डॉक्टर, नर्स, विविध खात्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. शासनाने १ मे पासून १८ वर्षांवरील युवकांना ही लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी उपलब्ध होणारी कोविड लस ग्रामपंचायती मार्फत प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन देण्यात यावी. अशी मागणी भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले यांनी करमाळा तहसिलदार समीर माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
           पुढे निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात लस उपलब्ध झाल्यास नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत आणि गर्दीचे प्रमाण वाढणार नाही. जर गर्दीचे प्रमाण टाळायचे असेल तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गल्ली नुसार नाव नोंदणी करून लसीकरण करण्यात यावे. असे केल्यास गर्दीमुळे होणारा संसर्ग होणार नाही. तसेच लसिकरणासाठी च्या सर्व सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध कराव्यात.
            या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विजय जाधव यांनी स्विकारले असून यावेळी भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले, सामाजिक कार्यकर्ते अनिल तेली, गिरिष दुधे उपस्थित होते.

दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads