केंद्र सरकारच्या डिझेल व पेट्रोल तसेच रासायनिक खतांच्या किमतीविरोधात खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन - दैनिक शिवस्वराज्य

केंद्र सरकारच्या डिझेल व पेट्रोल तसेच रासायनिक खतांच्या किमतीविरोधात खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन


केंद्र सरकारच्या भरमसाठ डिझेल व पेट्रोल दरवाढ विरोधात दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.संजयराव कदम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव यांनी दिनांक १८/५/२०२१ मंगळवार रोजी खेड प्रांत श्री.अविश कुमार सोनोने व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी खेड सौ.प्राजक्ता घोरपडे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

कोरोना काळात वाढती महागाई लक्षात घेता आधीच लोकांकडे काम नाही.त्यातही पेट्रोल,डिझेल,गॅस,तथा शेती उपयोगी रासायनिक खते यांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.आधीच देशातील जनतेचे कोरोना मुळे अर्थिक स्थितीने कंबरडे मोडले आसताना  त्यातही माहागई डोके वर काढत आहे.त्यामुळे जनतेचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे.त्यात ही महागाई पुन्हा भर पाडत आहे.

केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलचे दर भरमसाठ वाढविले आहेत.त्याचप्रमाणे सर्व सामान्यचे घरगुती वापरासाठी लागणारे गॅस सिलेंडर दरसुध्दा वाढविले आहेत.त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.सध्याच्या कोविड १९ महामारीच्या काळात केंद्र सरकारने जनतेस आधार देणे  गरजेचे असतानाच या कृषी प्रधान देशात सर्व रासायनिक खतांच्या किंमती सध्याच्या भावापेक्षा ४०% वाढविल्या आहेत.त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करण्याऐवजी रासायनिक खताचे दर वाढवुन शेतकऱ्यांना उध्दवस्त करण्याचे काम केले आहे.या प्रवृत्तीचा आम्ही खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.

तरी रासायनिक खतांच्या वाढविलेल्या किंमती ताबडतोब कमी कराव्यात तसेच पेट्रोल व डिझेल चे दर कमी करावे अशी आमची मागणी आहे.

सदर वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.सतु कदम,पंचायत समिती माजी सदस्य श्री.प्रकाशराव मोरे,युवक तालुकाध्यक्ष अँड श्री.अश्विन भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड शहराध्यक्ष व मा.नगरसेवक श्री.सतिश उर्फ पप्पू चिकणे,युवती शहराध्यक्षा अॅड सौ.पुजा तलाठी,सुकिवली मा.सरपंच श्री. विनायक निकम,श्री.सचिन उर्फ बंड्या सावंत,श्री.काकाडे सर,श्री.विक्रांत कदम तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads