खेड शहर मराठा समाजाच्या वतीने कोरोना प्रेते दहन करण्याचे काम करणाऱ्या देवदूतांचा सन्मान - दैनिक शिवस्वराज्य

खेड शहर मराठा समाजाच्या वतीने कोरोना प्रेते दहन करण्याचे काम करणाऱ्या देवदूतांचा सन्मान


             मंगळवार दिनांक १८/०५/२१ रोजी खेड  तालुक्यातील नगर परिषद स्मशान भूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलेल्यांचा विधिवत अंत्य संस्कार जे नगर परिषदेचे सफाई कामगार करत खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवत आहेत अशा सात सफाई कामगारांचा खेड शहर मराठा समाजाच्या वतीने सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
         जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे या उक्तीचे प्रत्यंतर ज्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत आहे अशा कोरोनामुळे समाजाने नाकारलेल्यांचा अंत्यसंस्कार हे देवदूत स्वतःचा जीव धोक्यात घालून करत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवत आहेत. श्री.कृष्णा गंगाराम निकम,अनिल तुळशीराम चव्हाण,सुनील दगडू जाधव, अरविंद हरिश्चंद्र सावंत, स्वप्नील चंद्रकांत जाधव, रामचंद्र संभाजी सावंत, शशिकांत पिंपळकर यांचा सत्कार करण्यात आला.
  यावेळी खेड नगरीचे नगराध्यक्ष मा.श्री.वैभवजी खेडेकर,उपनगराध्यक्ष मा.श्री.सुनीलजी दरेकर, मुख्याधिकारी श्री.प्रसाद शिंगटे, नगरसेवक प्रशांत कदम,अजय माने,अंकुश विचारे,नगरसेविका सुरभी धामणस्कर,नम्रता वडके, सीमा वंडकर श्री.महेंद्र शिरगावकर आदी मान्यवरांसह मराठा समाजबांधव श्री.शरद शिर्के, नंदू साळवी,सतीश चिकणे, सुभाष देसाई,डॉ.अजित भोसले,सुरेश चिकणे,दिपक नलावडे,साळुंखे सर, सुहास भोसले, राजू आंबरे, अमोल दळवी, सिद्धेश साळवी,तुषार सापटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्री.शरद भोसले यांनी केले.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads