महाराष्ट्र
येणाऱ्या खरीप हंगामात बोगस खते बियाणे विकाल तर खबरदार ; शेतकरी कृती समितीचा इशारा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी मंगेश पाटील
धरणगाव -येणाऱ्या खरीप हंगामामध्ये बोगस खते बियाणे बाजारात विक्रीस येऊन शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर खबरदार शेतकरी कृती समिती शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा घेण्यात आला धरणगाव तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी हा हतबल झालाआहे तसेच कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येण्याची शक्यता आहे त्या परिस्थितीत शेती करणे अवघड होणार आहे शेतीसाठी लागणारे खते बियाणे फवारणीचे औषधे यासारख्या अन्य वस्तूंची भाववाढ होऊन शेतकऱ्यांना फटका बसणार आहे त्यातच बोगस खते बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे यामुळे शासनाने याबाबत सतर्कता ठेवून बोगस गिरी होणार नाही याची काळजी घ्यावी व तसे आढळून आल्यास कार्यवाई करावी व नुकसान झाले की शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असतो त्यांच्या लाखमोलाची जीव जाऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच दक्षता घ्यावी अन्यथा शेतकरी कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी.
गोपाल पाटील
शेतकरी कृती समिती धरणगाव तालुका समन्वयक
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा