संजयराव कदमांच्या माध्यमातून चिंचघरमध्ये वृक्षारोपण - दैनिक शिवस्वराज्य

संजयराव कदमांच्या माध्यमातून चिंचघरमध्ये वृक्षारोपण


राकेश कोळी उपसंपादक :-

दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा. आमदार श्री. संजयराव कदम यांच्या माध्यमातून चिंचघर ग्रामपंचायत भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
प्रचंड प्रमाणात करण्यात आलेली जंगलतोड व अन्य काही कारणांमुळे झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या बाबत शासनाकडुन प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवुन सर्वत्र जनजागृती केली जात आहे. या उद्देशाने दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा‌. आमदार श्री. संजयराव कदम यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा संकल्प करून समाजाला एक चांगला संदेश दिला आहे. सदर कार्यक्रमा प्रसंगी चिंचघर ग्रामपंचायत सदस्य श्री. सखाराम उर्फ आप्पा जाधव, श्री. संदीप सावंत,श्री. प्रदोश उर्फ भाई कडु, श्री. अविनाश जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads