महाराष्ट्र
परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत वृक्षारोपण
प्रतिनिधी / बालाजी गोरे :-
परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पूर्णा तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन कोविड - 19 चे लसीकरण करण्याचे आणि वृक्ष लागवडीचे तांत्रिक मार्गदर्शन गावकर्यांना केले.
दि.23 जून रोजी सीईओ टाकसाळे यांनी पूर्णा तालुक्यातील माखणी, न-हापुर, आलेगाव या ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. यावेळी लसीकरणा बाबत मार्गदर्शन करताना टाकसाळे म्हणाले की, शेतामध्ये पिकावरील एखादा रोग नाहीसा करण्यासाठी जसे आपण औषधीचा वापर करतो अगदी त्याप्रमाणे आपल्या शरिरातील कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. लसीकरणाच्या बाबतीत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने कोविड - 19 चे लसीकरण करणे खूप गरजेचे असल्याचे टाकसाळे यांनी सांगितले. तर सध्या सुरू असलेल्या वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत वृक्षांची लागवड कशा पद्धतीने करावी याची तंत्रशुद्ध पद्धती टाकसाळे यांनी उपस्थितांना समजावून सांगितली. तसेच शेतातील लिंबोळ्या गावकरी आणि अधिकार्यांच्या मदतीने गोळा करून त्यांचीही लागवड करण्यात आली. तसेच बानेगाव अंतर्गत माहेर या गावामध्ये रात्री उशिरापर्यंत थांबून सीईटओ टाकसाळे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. गावात असलेल्या वीज, पाणी, रस्ते, विहीर खोदकाम अशा समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी राहुल गीते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.रावजी सोनवणे, सभापती अशोक बोकारे, गट विकास अधिकारी अमित राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप काळे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा साबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिता वानखेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचार्यांची उपस्थिती होती.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा