महाराष्ट्र
ओबीसी अरक्षणासाठी बुलढाणा भाजपचे जिल्हाभर चक्का जाम आंदोलन
संतोष पाटील (कुळसुंदर )जिल्हा प्रतिनिधी :-
ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकविण्यात महविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप करत या नाकर्त्यापणाच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज 26जूनला 11वाजे पासून जिल्हा भर चक्का जाम आंदोलन करण्यात आले विविध मार्गांवर आणि रस्त्यावर पदाधिकारी ठाणं मांडून बसले होते चिखली येथे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड विजय कुमार कोठारी. तालुका अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ. सुहास शेटे. सभापती सौ. सिंधुताई तायडे. संतोष काळे पाटील. यांनी खामगाव चिखली महामार्गावर तर खामगाव येथे भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. आकाश दादा फुंडकर आमदार यांच्या नेतृत्वात अकोला खामगाव महामार्गावर आंदोलन करण्यात आले आंदोलनात सागर फुंडकर. शांताराम बोधे. दिलीप पाटील. विलास काळे. व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते तर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंदोलनात भाजपा चे पदाधिकारी देऊळगाव राजा येथे जिल्हा उपाध्यक्ष डॉ गणेश मान्टे व वैद्यकीय आघाडी चे जिल्हा अध्यक्ष डॉ सुनील कायंदे तर बुलढाणा येथे महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष. सौ सिंधुताई खेडेकर जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील. व कार्यकर्ते हजर होते तर लोणार येथे भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष श्री. सुभाषराव घिके यांच्या नेतृत्वात तर शेगाव येथे शेगाव नगराध्यक्ष सौ. शकुंतला बूच. तालुका अध्यक्ष. विजय भालतड्क व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा