महाराष्ट्र
माननीय मुख्याध्यापक गुलाब इब्राहिम तांबोळी गुरुजी यांच्या सेवा निवृत्ती निमित्त भव्य नागरी सत्कार करण्यात आला
सलिम शेख मंगळवेढा ता.प्रतिनिधी :-
मंगळवेढा : माननीय मुख्याध्यापक गुलाब इब्राहिम तांबोळी गुरुजी यांच्या सेवा निवृत्ती निमित्त सिद्धापूर जिल्हा परिषद शाळा सिद्धापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा आज सिद्धापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास सिद्धापूर गावचे सरपंच लक्ष्मी निंगप्पा नागरे यांचे सुपुत्र अण्णासाहेब नागरे पाटील उपसरपंच भीमराया सिंदखेड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब रामचंद्र चौगुले सर व ग्रामपंचायत सदस्य रसूल मुलाणी सर नाना मलगोडे प्रताप सिंग राजपूत संजय कुनाळे आणि गावातील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते सदरहू कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कोळी गुरुजी यांनी केले व कार्यक्रमाचे आभार पुजारी सर यांनी मानले माननीय मुख्याध्यापक तांबोळी गुरुजी तर्फे शाळेला मुलांना शैक्षणिक उपयोग होण्याकरिता 98 इंची व्हिडिओकॉन कंपनीचा एल इ डी टीव्ही भेट म्हणून देण्यात आले गुलाब तांबोळी गुरुजी यांचा जिल्हा परिषद शाळा सिद्धापूर व ग्रामपंचायत सिद्धापूर तर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला तांबोळी गुरुजी बद्दल त्यांचे सहकारी शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला आपल्या मनोगतात बोलताना तांबोळी गुरुजींनी सांगितले की मी शाळे बद्दल अत्यंत ऋणी आहे तरीसुद्धा मी निवृत्त झालो तरी मुलांना शिकवण्यासाठी येत राहीन तसेच शाळेची निघा सहकारी शिक्षकांनी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी राखावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व मुलांमधील गुणवत्ता वाढीस न्हावी असे त्यांनी आपल्या बोलण्यातून तळमळ व्यक्त केले .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा