धनगर समाज बांधवांच्या सेवेसाठी विनामुल्य ॲम्बूलन्स - दैनिक शिवस्वराज्य

धनगर समाज बांधवांच्या सेवेसाठी विनामुल्य ॲम्बूलन्स



राकेश कोळी उपसंपादक :-

खेड तालुक्यातील खोपी गावचे रहिवासी समाज सेवेची आवड असणारे धनगर समाजाचे युवा नेतृत्व, प्रसिध्द ट्रॅव्हल्स व्यवसायक रूपेश बाळाजी गोरे यांनी धनगर समाज बांधवांच्या अडीअडचणींचा विचार करून फक्त अत्यावश्यक रूग्णांना तालुक्यातील रूग्णालयांमध्ये घेऊन जाण्यासाठी विनामुल्य गाडी देण्याचे जाहीर केले आहे.
धनगर समाज हा डोंगर द-यांमध्ये राहाणारा व शासकीय सुविधांपासून वंचित असणारा समाज आहे. बहूतांश धनगर वाड्यांवर परिपुर्ण रस्त्याची सोय नसल्याने एखादा सिरेअस आजारी रूग्ण दवाखान्यात घेऊन   जाण्यासाठी डोलिचा वापर आजच्या अधुनिक युगात करावा लागतो. धनगर समाजाच्या अडीअडचणीच्या काळात शक्यतो गावातील कोणीही मदत करण्यास पुढे येत नाही. अशा परीस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या ओढीने समाजातील एक तरूण समाजाच्या मदतीला धाऊन येत आहे हि समाधानाची बाब आहे. समाजसेवक रूपेश बाळाजी गोरे यांच्या या धाडशी निर्णयाचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. भविष्यात धनगर समाजातील युवा पिढी रूपेश बाळाजी गोरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करण्यास पुढे येतील अशी आशा आहे. समाजसेवक रूपेश बाळाजी गोरे यांनी अत्यावश्यक रूग्ण सेवेसाठी जाहीर केलेल्या विनामुल्य गाडीचा लाभ खेड तालुक्यासह जवळच्या मंडणगड, दापोली, चिपळूण तालुक्यातील काही गावांना होणार आहे. मोफत गाडी सेवेचा लाभ घेण्याचे अवाहन ही समाजसेवक रूपेश गोरे यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads