महाराष्ट्र
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मिशन 100 आदर्श शाळांअंतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात सुधागड मधील राजीप नवघर शाळेची निवड
सुधागड /कोंडगाव ,(विशेष प्रतिनिधी) राम तुपे
सुधागड पाली महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मिशन 100 आदर्श शाळांअंतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात रायगड जिल्ह्यामधून सुधागड तालुक्यातील राजीप नवघर शाळेची निवड झाली आहे. त्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल 3 लाख 60 हजारांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यांमधून या अभियानांतर्गत फक्त चार शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सुधागड तालुक्यातील रा जि प शाळा नवघर, माणगाव तालुक्यातील रा जि प शाळा मुठवली तर्फे तळे, म्हसळा तालुक्यातील रा जि प शाळा खरसई आणि पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील रा जि प शाळा कापडे बुद्रुक या शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना अनुक्रमे 3 लाख 60 हजार, 3 लाख 21 हजार, 3 लाख 20 हजार आणि 3 लाख 13 हजार इतका निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या निधीचा वापर शाळेतील विद्यार्थ्यांकरीता आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे.
रा जि प आदर्श शाळा नवघरची ठळक वैशिष्ट्ये
या शाळेला सन 2018 19 चा रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे.
पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असलेली सुधागड तालुक्यातील पहिली उच्च प्राथमिक शाळा.
लोकसहभागातून सर्व वर्ग डिजिटल असलेली सुधागड तालुक्यातील पहिली शाळा.
लोकसहभागातून सर्व वर्गातील इ लर्निंग सुविधा प्राप्त असलेली सुधागड तालुक्यातील पहिली.
शाळा लोकसहभागातून स्वतंत्र संगणक कक्षाची निर्मिती त्यात एक टच स्क्रीन स्मार्ट बोर्ड.
15 कम्प्युटर, इन्वर्टर, वायफाय सुविधा. संगणक शिकवण्यासाठी बीएससी आयटी शिक्षिका व सकाळी 30 विद्यार्थ्यांना नाष्टा.
संगणक कक्षात विद्यार्थ्यांना इंग्रजी व संगणकाचे ज्ञान दिले जाते संगणक शिक्षिकेचा पगार व तीस विद्यार्थ्यांचा नाश्ता यांचा खर्च आश्रम ट्रस्ट मार्फत केला जातो.
लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे शौचालय बांधकाम.
VSTF मधून प्राप्त झालेल्या सौरऊर्जेवर संपूर्ण शाळेचे विद्युतीकरण.
स्वदेश फाऊंडेशन मार्फत मुलांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय.
शाळेत स्वतंत्र विज्ञान प्रयोग शाळेची सोय. शाळेत विविध क्रीडा साहित्य.
लोकसहभागातून शाळेचे वॉल कंपाऊंडची सोय.
शाळेच्या चालू वर्षाचा पट तब्बल 165 आहे.
शाळा सतत चार वर्षे प्रगत आहे.
शाळा सिद्धीमध्ये शाळा सतत तीन वर्षे अव्वल गुण मिळवून अ श्रेणी मध्ये आहे.
शाळेला आजपर्यंत जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी,शिक्षण अधिकारी व इतरअनेक मान्यवरांनी भेट दिली आहे.
स्वदेस फाउंडेशन च्या सर्व योजना शिक्षक स्वखर्चाने राबवित आहेत. या सर्व उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक जगदीश प्रभाकर म्हात्रे, शिक्षक प्रमोद हिरामण म्हात्रे, वृषाली वसंत केळुसकर, राकेश कृष्ण गदमले, शितल बळवंत पाटील, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र विश्वनाथ जाधव व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा