भारतीय जनता पक्षाचे 12 आमदार निलंबन करून आघाडी सरकारकडून लोकशाहीची हत्या : यतीन शहा - दैनिक शिवस्वराज्य

भारतीय जनता पक्षाचे 12 आमदार निलंबन करून आघाडी सरकारकडून लोकशाहीची हत्या : यतीन शहा


 
समीर शेख सोलापूर जिल्ह्य प्रतिनिधि

द.सोलापूर (मंदूप) :-  भारतीय जनता पक्षाचे 12 आमदारांवर आघाडी सरकारकडून लोकशाहीची हत्या करण्यात आली असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस यतीन शहा यांनी केले आहे.
     यावेळी भारतीय जनता पक्ष ता.दक्षिण सोलापूर च्या वतीने या आघाडी सरकारच्या विरोधात निषेध करून अप्पर तहसीलदार  मंद्रुप यांना निवेदन देण्यात आले
         यावेळी भारतीय जनता पक्षांचे जेष्ठ नेते हणमंत कुलकर्णी, भारतीय जनता पक्षांचे तालुका सरचिटणीस यतीन शहा,भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर मेंडगुदले,ग्रामपंचायत सदस्य सोमनिंग कमळे,अप्पासाहेब मोटे,विश्वनाथ हिरेमठ,इरप्पा बिराजदार, श्रीमंत व्हनमाने यांच्यासह आदी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
       यतीन शहा पुढे बोलताना म्हणाले की,जनतेनी निवडुन दिलेले आमदार यांना विधानसभेत नागरीकांचे प्रश्न उपस्थित करून त्याची सोडवणुक करण्यासाठी प्रयत्न करत असतात पण आघाडी सरकारकडून असे आमदार निलंबित करून लोकशाहीची हत्या करत आहेत यासाठी या आघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो.असे ते शेवटी बोलताना म्हणाले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads