राजकीय
राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बोराळे गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी :-
बोराळे : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे संस्थापक माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बोराळे गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम "एक झाड गावासाठी" "माझं गाव माझी जबाबदारी". असा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मंगळवेढा पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील मॅडम जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते बोराळे गावाचे मी सरपंच विनोद पाटील प्राध्यापक संतोष पवार प्रहार युवा जिल्हाध्यक्ष यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मौजे बोराळे व परिसरात 101 झाडांची लागवड करण्यात आली. त्याच बरोबर गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राजश्री पाटील मॅडम म्हणाल्या सध्याच्या काळात वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे लागवड केलेल्या वृक्षांचे जतन करणे सर्वांचे कर्तव्य आहे असे पाटील मॅडम म्हणाल्या.
या कार्यक्रमास मंगळवेढा पंचायत समिती माजी सभापती बाबासो पाटील बोराळे चे माजी सरपंच दिलीपकुमार धनवे,शिवशंकर कवचाळे, प्रहार जनशक्ती पक्ष महिला जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी ताई पाटील प्रसिद्धीप्रमुख राजू सावंत प्रहार शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सचिन गरंडे बोराळे गावाचे उपसरपंच संतोष गणेशकर, उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी ,नवनाथ शिरसटकर,
आकाश मोहिते कैलास पाटील मदार ढालाईत हैदर इनामदार नागू म्हमाणे अमोगसिद्ध काकणकी, महेश तळे, प्रवीण कोरे, राहुल धनवे ,या सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर कष्ट घेतले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा