महाराष्ट्र
अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे महसूल प्रशासनाने तात्काळ केली कारवाई गोहेगाव ते कऱ्हाळंवाडी शेत रस्ता वहिवाटी साठी खुला
संतोष पाटील (कुळसुंदर )जिल्हा प्रतिनिधी
गोहगांव दांदडे ते कह्राळवाडी शेत रस्त्याचा जटिल झालेल्या प्रश्न हा मा. तहसीलदार साहेब डॉ. संजय गरकळ मेहकर यांना भेटून दिनांक 8 /6 /2021 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले व पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालय गाठले व मा. तहसीलदार मेहकर डॉ. संजय गरकळ यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली व सदर निवेदन देण्यात आले होते. की सदर शेत रस्ता शेतकऱ्यांसाठी खरिपाच्या पेरणीसाठी तात्काळ खुला करून देण्यात यावा सदर रस्ता हा नकाशावर व टिपण उताऱ्यावर असून शेतकऱ्यांना सध्या शेतात पेरण्यासाठी जाणे जिकिरीचं होत असून सध्या शेतकऱ्यांना क-हाळवाडी वरुन जाऊन आपल्या शेतात जावे लागते.
बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये फवारणी व डवरणी करायची असून शेत रस्ता अडवल्यामुळे गावामध्ये वाद-विवाद होऊ शकतात व यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो. म्हणून आपण तात्काळ संबंधित शेत्त रस्त्याची मोका पाहणी करण्यासाठी संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेश द्यावे व मोका पाहणी अहवाल तात्काळ मागवून सदर रस्ता वहिवाटिस खुला करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावर करावी. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर सुद्धा प्रशासनाने सदर निवेदनाची दखल न घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह गोहगांव येथील बाधीत शेतकरी दिलेल्या ईशारा प्रमाणे दि.१/७/२०२१ रोजी तहसील कार्यालय येथे एक दिवसिय लाक्षणिक उपोषण जिल्हा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केले व त्या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करीत महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयांमध्ये मुक्काम आंदोलन करण्यात येईल असे ठणकावून सांगितले. पुढील आक्रमक आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्याचा इशारा देताच महसूल प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवीत संबंधित शेत रस्ता गोहोगाव ते क-हाळवाडी वहिवाटिस खुला करण्याची कारवाई तातडीने सुरू केली व अखेर दिनांक 6 जुलै रोजी खुला करण्याबाबतचे आदेश दि.२/६/२०२१रोजी निर्गमित केले. मा. तहसीलदार मेहकर यांनी काढले संबंधित आदेश पोलीस प्रशासन यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त द्यावा तसेच उप अधीक्षक भूमि अभिलेख यांनासुद्धा रेकॉर्ड सह उपस्थित राहण्यासाठी बजावले यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. संतोष मुंडे मंडळ अधिकारी श्री रहाटे तलाठी गोपाल उंबरकर उप अधीक्षक तालुका भुमी अभिलेख कायर्यालयाचे व भुमापक सानप तसेच डोणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत मोठा पोलिस बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता.व अखेर जेसीबीच्या साह्याने सदरील शेतरस्ता खुला करण्यात आला. यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष यांनी संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला व शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळवून दिला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा