महाराष्ट्र
जीवन आधार फाउंडेशन मार्फत माणुसकी फाउंडेशनचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान
बदलापूर प्रतिनिधी प्रशांत आडसर
जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश मा. श्री. संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पोवार याच्या विनंतीनुसार इचलकरंजी शहर तालुका हातकणंगले येथे जीवन आधार फौंडेशन मार्फत माणुसकी फौंडेशन चा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत कोरोना काळा मध्ये काम करणाऱ्या माणुसकी फौंडेशन चा सन्मान करण्यात आला तसेच त्यांना वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली. यावेळी रवी जावळे (संस्थापक अध्यक्ष माणुसकी फौंडेशन) यांना तसेच यांच्या टीम ला जीवन आधार फौंडेशन अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार, पश्चिम महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष अरविंद कांबळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन तुळसे, शहर युवक अध्यक्ष शुभम पोळ, शहर युवक संपर्क प्रमुख सुभाष यादव , दिपक बसवणी बन्ननावर
हातकणंगले तालुका उपाध्यक्ष, तसेच आकाश नरुटे ,इम्रान शेख, रुपेश सुतार,ओम सुतार,ऋषिकेश चव्हाण,गोपाल उरने आदी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा