महादेव कोगनुरे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचा "विशेष सामाजिक सन्मान" जाहीर - दैनिक शिवस्वराज्य

महादेव कोगनुरे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचा "विशेष सामाजिक सन्मान" जाहीर


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी समीर शेख

सोलापूर : एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापक (महाराष्ट्र राज्य) सागर सिमेंट लिमिटेड श्री महादेव कोगनुरे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचा "विशेष सामाजिक सन्मान" जाहीर झाला आहे.पुरस्कार वितरण सोहळा उद्या रविवार दिनांक ४ जुलै २०२१ रोजी ठिक सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पार पडणार आहे.


 या कार्यक्रमास  प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री), राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र), देवेंद्र फडणवीस (विरोधी पक्षनेते), विजयसिंहराजे पटवर्धन (सांगली), विजय बावीस्कर (समूह संपादक, दै. लोकमत), विवेक गिरधारी, कार्यकारी संपादक (दै. पुढारी. मुंबई), डॉ. पी. एन. कदम (व्यवस्थापकीय संचालक, संकल्प) हे उपस्थित राहणार आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads