महाराष्ट्र
जामनेर भर दिवसा चोरट्यानी लांबवीले महीलेचे १ लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र
नितीन इंगळे जामनेर तालुका प्रतिनिधी :-
जामनेर येथील गिरजा कॉलनी मधील महिला सारीका सतीष इंगळे हे त्यांच्या शेताकडे बोदवड रस्ताने जात असतांना चोरटयानी मोटार सायकल वर जात असतांना त्यांचे मंगळसूत्र गळ्यातून हिसकावून घेतले व चोरट्यानी तेथून पळ काढला असता सारीका इंगळे या महीलीने धाडस करून चोरटयाचा पाठलाग केला असता चोरट्यानी त्याची दुचाकी मोटार सायकल रस्ताने सोडून शेता शेताने पळून पलायन केले सारीका इंगळे या महिलेने चोरटयाचा पाठलाग करत असतांना त्यांची गाडी स्लीप झाली व त्या थोड्या फार जखमी झाल्या सदर मोटार सायकल जामनेर पोलीस स्टेशन ला जमा केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शना नुसार पोहे कॉ दिलीप वाघमोडे करीत आहे
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा