राजकीय
वामन म्हात्रे व एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून बदलापूर येथे १५० बेडचे कोविड सेंटर मंजूर
प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-
कोरोना ह्या महामारीचा वाढता प्रादुर्भाव व पावसाचे संकट पाहता बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी मागणी केली होती की आदर्श विद्या मंदिर येथे १५० बेड चे कोविड हॉस्पिटल होणे गरजेचे आहे आज त्या मागणीला यश आले असून काल दि ०२-०७-२०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन या विषयी चर्चा करण्यात आली त्यांनी आदर्श विद्या मंदिर येथे होणाऱ्या हॉस्पिटलला तात्काळ मंजुरी देऊन एम एम आर डी ए च्या माध्यमातून भरगोस निधी उपलब्ध करून दिला त्या बद्दल माननीय नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथजी शिंदे व बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष श्री वामन दादा म्हात्रे साहेब यांचे संपूर्ण बदलापूर शहरातील नागरिकांच्या वतीने मनापासून आभार मानले !
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा