राजकीय
बुलढाणा : नानांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ठरणार काँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष
संतोष पाटील (कुळसुंदर ) जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा : अखेर काँग्रेस पक्षाचा नवा जिल्हा अध्यक्ष पदाचा मुहूर्त ठरला काँग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष श्री नाना पटोले हे दिल्ली दौऱ्या नंतर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदावर शिक्का मोर्तब करतील अशी अपेक्षा जिल्हातील नेत्यांना आहे येणाऱ्या काळात जिल्हातील11नगरपरिषद 2नगर पंचायतच्या निवडणुका येत्या डिसेंबरच्या आसपास होणार आहे. त्यापाठोपाठ पुढील वर्षीच्या प्रारभी जिल्हा परिषद व 13पंचायत समितीच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे त्यामुळे जिल्हा अध्यक्ष पदाचा फैसला तातडीने करावा अशी आशा जिल्हातील नेत्यांना वाटते राजकीय क्षेत्रात मानाचे पद समजले जाणाऱ्या यापदाच्या नियुक्ती साठी काँग्रेस वर्तुळात लगीन घाई चालली आहे अध्यक्ष पदासाठी बरेच नेते इच्छुक आहे तसेच वर्तमान अध्यक्ष माजी आमदार राहुल बोन्द्रे पुन्हा अध्यक्ष पद घेण्यास इच्छुक असून मात्र राष्ट्रीय पातळीवर तीन वर्ष झालेल्याना बदलायचे असा निर्णय झाल्याने त्यांना डचू मिळणे क्रमप्राप्त ठरले आहे नवीन अध्यक्ष पदासाठी ऍड श्री विजय सावळे. जि. प. सदस्य जयश्रीताई शेळके. माजी आमदार हर्षवर्धन दादा सपकाळ. ही नावे अंतिम निवडीसाठी पॅनल मध्ये असल्याची माहिती आहे या शिवाय संतोष आंबेकर. दीपक रिंढे. प्रकाश पाटील. कासम गवळी. चीत्रागण खंडारे. हे देखील इच्छुक आहे व प्रयत्नशील आहे भावी निवडणुका तोंडावर आल्याने पक्ष श्रेष्टीना जुलै अखेर पर्यत निर्णय घेणे अटळ आहे नवीन अध्यक्षना अभ्यास दौरे संपर्क नवीन नियुक्त्या व भावी लढतीचे नियोजन करण्यासाठी कालावधी मिळणे आवश्यक आहे त्यामुळे स्वबळाची भाष्या बोलणारे नाना पटोले लवकरच दिल्ली गाठून पक्षश्रेष्टी आणि जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुलजी वासनिक यांच्या संमतीने अध्यक्ष पदाचा फैसला करतील अशी आशा आहे.
Previous article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा