महाराष्ट्र
मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची खेड भाजपाची मागणी
राकेश कोळी उपसंपादक :-
खेड बाजारात मोकाटपणे फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी खेड भाजपाने निवेदनाव्दारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
सध्या बर्याच दिवसानंतर व्यापाऱ्यांना निर्बंधामधून सुट मिळाली आहे. नुकतीच बाजारपेठ सुरू झाली असून सध्या बाजारपेठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मोकाट गाढव, कुत्रे व जनावरांमुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही जनावरे कोणाला चावल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी खेड शहर भाजपकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब जोशी, माजी उपनगराध्यक्ष वैभव खेडेकर, संजय बुटाला, अमित खेडेकर, रोहन राठोड, बशीर मुल्लाजी, अविनाश माने उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा