राशिभविष्य
आजचे राशिभविष्य २३-०७-२०२१
आजचे राशिभविष्य २३-०७-२०२१
मेष :-
श्रीगणेश सांगतात की आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल , परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे टत राहील . धार्मिक व मंगल कार्याला उपस्थिती लावाल . तीर्थयात्रेचे योग आहेत . रागावर ताबा ठेवावा लागेल . संतापामुळे नोकरी - धंद्यात किंवा घरी मतभेद होतील .
वृषभ :-
हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल . कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल . खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल . नवीन काम सुरू करायला वेळ योग्य नाही . यात्रा- प्रवासात विघ्ने येतील . नोकरी- व्यवसायाच्या जागी कामाचा बोझा वाढेल , त्यामुळे थकून जाल . योग साधना व आध्यात्मिकता आपणाला मानसिक शांतता देईल असे श्रीगणेश सांगतात .
मिथुन :-
श्रीगणेश कृपेने आरामदायक आणि प्रसन्नतापूर्वक दिवसाचा प्रारंभ स्फूर्तीने होईल . पाहुणे आणि मित्रांच्या संगतीत मेजवानी , पिकनिक आणि सहभोजनाचा बेत ठरवाल . नवे कपडे , दागीने आणि वाहन खरेदीचे योग आहेत . मन आनंदाने भरून जाईल . भिन्नलिंगीय व्यक्तीचे आकर्षण राहील . सार्वजनिक जीवनात सन्मान मिळेल आणि लोकप्रियता वाढेल . व्यापारात भागीदारीमध्ये फायदा होईल . दांपत्यसुखाची प्राप्ती होईल .
कर्क :-
आजचा दिवस चिंतामुक्त , खुशीचा राहील . कुटुंबीयांतील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकाल . त्यांच्या समवेत घरात वेळ घालवाल . कार्यात सफलता आणि यश मिळेल . नोकरदारांना नोकरीत लाभ होईल . सहकारी सहकार्य करतील . तब्बेत चांगली राहील . प्रतिस्पर्थ्यांची चाल निष्फळ ठरेल .
सिंह :-
श्रीगणेश सांगतात की आज आपण तन - मन देहाने स्वस्थ राहाल . आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूप व्यक्त करील . साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल . प्रिय व्यक्तीशी झालेली भेट सुखद ठरेल . संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील . विद्यार्थ्यांसाठी फार चांगला काळ म्हटला पाहिजे . हातून एखादे पुण्यकार्य घडेल . आध्यात्मिकतेकडे फल झुकेल .
कन्या :-
आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल . तब्बेत यथा तथाच राहील . मनाला चिंता घेरतील . आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची तब्बेत बिघडेल . आपल्याच लोकांशी खटके उडतील व मतभेद निर्माण होतील . स्वाभिमान भंगणार नाही याची काळजी घ्या . घर , वाहनाच्या खरेदी - विक्रीसाठी काळ चांगला नाही . पाण्यापासून भीती आहे .
तूळ :-
नवीन कामाचा श्रीगणेशा करायला दिवस चांगला आहे . भाग्योदय आणि धनलाभाची शक्यता आहे . कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल . जवळा सच्या धार्मिक स्थानी प्रवासाचा बेत आखाल . विदेशातून चांगल्या वार्ता येतील . भावा- बहिणींशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील . श्रीगणेश कृपेने आज शरीर व मनाचे स्वास्थ्य अनुभवाल .
वृश्चिक :-
श्रीगणेश सांगतात की घरात सुख शांती नांदेल . नातलग आणि मित्रांचे आगमन होईल . मिष्टान्न भोजन मिळेल . धार्मिक कार्यावर खर्च होईल . अलंकार आणि सुगंधी पदार्थांची खरेदी कराल . आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल . धनलाभ होईल . कौटुंबिक प्रश्न सहजगत्या सोडवाल . विद्यार्थ्यांना हमखास यश मिळेल .
धनु :-
श्रीगणेशांच्या मते संततीचे सुख आणि स्वास्थ्य सुधारेल आणि विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास उत्तम वेळ आहे . विदेश व्यापारात लाभ होईल . आपल्या हातून धार्मिक व मंगल कार्य संपन्न होईल . स्नेहीवर्ग आणि मित्रांच्या भेटीने आनंद होईल . आर्थिक लाभ होईल . जीवनसाथी कडून सुख - समाधान मिळेल . सामाजिक प्रतिष्ठा वाढेल . सुरस भोजनाची प्राप्ती होईल . तब्बेत चांगली राहील .
मकर :-
तब्बेतीच्या तक्रारी राहतील . विचित्र अनुभव येतील . व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल . धार्मिक कार्यावर खर्च कराल . आध्यात्मिक व धार्मिक व्यवहार वाढतील . शत्रू सतावून सोडेल . डा डोळ्याचा त्रास होईल . स्त्री आणि संततीची काळजी राहील . दुर्घटनेपासून जपा असा सल्ला श्रीगणेश देत आहेत .
कुंभ :-
मंगल कार्य आणि नवीन कार्य आयोजनासाठी दिवस चांगला आहे . अविवाहितांचे विवाह ठरतील . पत्नी आणि संततीकडून शुभ वार्ता मिळतील . गृहस्थजीवन आणि दांपत्यजीवन यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल . मित्रमंडळ आणि वडीलधाऱ्यांकडून तसेच नोकरी धंद्यात बहुविध लाभप्राप्ती होईल . श्रीगणेश कृपेने उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल .
मीन :-
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल . नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल . व्यापाऱ्यांची येणी वसूल होतील . वडील आणि वडीलधाऱ्यांकडून लाभ होईल . आर्थिक लाभ होतील आणि परिवारात आनंद पसरेल . सरकारकडून लाभ होतील . सार्वजनिक मान सन्मान वाढतील . तसेच गृहस्थीजीवनात सुख- शांतीने धन्यता वाटेल .
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा