राजकीय
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी :-
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ (दादा)भालके यांच्या शुभहस्ते नेत्ररोग तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात डॉ निनाद नागणे व डॉ अक्षय ठेंगील यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अत्याधुनिक पद्धतीने 265 लोकांचे नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.
रेवनील ब्लड बँक सांगोला व शहर राष्ट्रवादी यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न होऊन 58 रक्तदात्यांनी रक्तदान करून या वेळी सहभाग नोंदवला. रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा व लतीफ भाई तांबोळी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले अशे विविध कार्यक्रम घेऊन अजित पवार यांचा वाढदिवस आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य विजयकुमार खवतोडे, भारत नागणे, अजित जगताप, चंद्रशेखर कोडुभैरी, तालुकाध्यक्ष भारत बेंद्रे, शहराध्यक्ष मुजम्मिल काजी, युवक शहराध्यक्ष संदीप बुरकुल,महिला अध्यक्षा संगीता कट्टे,
नगरसेविका राजश्री टाकणे, सोमनाथ माळी,मुरलीधर सरकले,प्रतीक किल्लेदार ,शिवाजी काळे, राजेंद्र आंमुगे, अशोक माने,बंडू बेंद्रे ,सुरेश कट्टे, सोमनाथ बुरजे, अमर सोमगुंडे, अमोल बचुटे, अशोक मगदूम,
संतोष सोनगे, दयानंद सोनगे, परमेश्वर लेंडवे, मनोज माळी, स्मिता उघडे, सुनिता मेटकरी ,मंदाकिनी सावंजी, प्रीती चूबुकनारायण, पंकज चव्हाण व अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा