राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द.सोलापूर च्या वतीने पेट्रोल,डिझेल,घरगुती गॕस च्या दरवाढीबाबत केंद्र सरकारच्या विरोधात मंद्रूप येथे आंदोलन - दैनिक शिवस्वराज्य

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द.सोलापूर च्या वतीने पेट्रोल,डिझेल,घरगुती गॕस च्या दरवाढीबाबत केंद्र सरकारच्या विरोधात मंद्रूप येथे आंदोलन



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

द.सोलापूर (मंदूप) :अप्पर तहसिल कार्यालय मंद्रूप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द सोलापूर च्या वतीने जनसामान्याचं जगणं मुश्किल केलेल्या पेट्रोल,डिझेल,घरगुती गॕस आदी दैनंदिन गोष्टी च्या बेलगाम दरवाढीबाबत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.केंद्र शासनाने वाढती बेरोजगारी,आर्थिक मंदी,लाॕकडाऊन काळात बंदअवस्थेत असलेले उद्योग व व्यापार आदी नी सामान्य जनता  त्रस्त असताना भरीस भर म्हणून ही होत असलेली दरवाढ ही अत्यंत त्रासदायक आहे.तरी ही दरवाढ त्वरीत थांबवावी यासाठी तमाम शेतकरी वर्ग,कामगार वर्ग,व्यापारी वर्ग,व सर्वसामान्य जनतेच्या  वतीने  जाहिर निषेध नोंदवत निवेदन सादर करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द.सोलापूर चे तालुका अध्यक्ष सुभाष जी पाटील,मा.कृ. सभापती अप्पाराव जी कोरे,प्रा सुभाषचंद्र जी बिराजदार सर ,श्री.शिवानंद जी बंडे (सरपंच,नांदणी),निंगण्णा तळे ,वैभव व्हरे ,गणेश जाधव ,अभिषेक कोरे  व मंद्रूप मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads