प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी घेतली सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची भेट - दैनिक शिवस्वराज्य

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी घेतली सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची भेट



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

दि. ०३ जुन रोजी केम या गावी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील कामानिमित्त आल्या असता सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची भेट झाली यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रहार संघटनेचे काम ज्या पद्धतीने चांगले व कौतुक करण्यासारखे आहे असे बोलून  कामाचे कौतुक करून सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
  यावेळी उपस्थित प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर बहुजन समाज पार्टी करमाळा तालुका अध्यक्ष राजाभाऊ कदम पांगरे गावचे संतोष बापू पाटील, विवेक पाटील, प्रकाश वाघमोडे, युनूस पठाण ,राहुल कोरे, पत्रकार समाधान फरतडे ,विष्णु ओहळ हे सर्व उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads