राशिभविष्य
आजचे राशिभविष्य ०४-०७-२०२१
आजचे राशिभविष्य ०४-०७-२०२१
मेष :-
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम उत्साह आणि आवेश यांनी पूर्णतः भरलेले असेल असा अनुभव येईल . शरीर व मन स्फूर्ती आणि टवटवीतपणाने भरेल . परिवारातील वातावरण चांगले राहील . मित्र आणि स्नेही यांच्यासोबत आनंदात वेळ घालवाल . आईकडून लाभ होईल . यात्रेचा योग संभवतो . धनलाभ , रुचकर भोजन आणि भेटवस्तू मिळाल्याने आपला आनंद वाढेल .
वृषभ :-
क्रोध आणि निराशेची भावना मनात पसरेल . तब्बेत साथ देणार नाही . घर परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील . आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल . परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल . गैरसमजापासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत .
मिथुन :-
कुटुंबात खुशीचे , आनंदाचे वातावरण राहील . नोकरी- व्यवसायात लाभाच्या वार्ता मिळतील . उच्च पदाधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील . विवाहयोग आहेत . स्त्री कडून विशेष लाभ होतील . उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता श्रीगणेशांना दिसते . दांपत्य जीवनात माधुर्याचा आनंद घ्याल . संततीकडून शुभ वार्ता मिळतील .
कर्क :-
गृहसजावटीवर विशेष लक्ष द्याल . घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल . व्यापारी आणि नोकरदार लाभाची आणि बढतीची अपेक्षा करू शकतात . कुटुंबात सुख- शांती लाभेल . सरकारी लाभ मिळतील . आपली मानप्रतिष्ठा वाढेल . आर्थिक लाभ होईल . आज सर्व कामे शांतपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकाल .
सिंह :-
श्रीगणेश सांगतात की स्वभावात उग्रता आणि संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही . वादविवादात आपल्या अहंकारमुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल . तब्बेतीकडे द्यावे लागेल . उतावीळपणामुळे निर्णय घेणे किंवा वाटचाल करणे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे . नोकरी धंद्यात अडचणी आल्याने नियोजित काम पूर्ण होऊ शकणार नाही . धार्मिक यात्रेचे नियोजन कराल .
कन्या :-
श्रीगणेशांच्या दृष्टीने आज तुम्ही एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही . बाहेरचे खाण्यामुळे तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे . क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल . पैसा जास्त खर्च होईल . हितशत्रूपासून सावध राहा . आग आणि पाणी यापासून जपा . सरकारी विरोधातील काम किंवा अनैतिक प्रवृत्ती संकट ओढवतील याकडे लक्ष द्या .
तूळ :-
प्रणय , रोमान्स , मनोरंजन आणि मौज- मस्तीचा दिवस आहे . सार्वजनिक जीवनात महत्त्व मिळेल . यश आणि कीर्ती वाढेल . भागीदारांबरोबर लाभाच्या गोष्टी होतील . भारी वस्त्रे आणि अलंकार यांची खरेदी होईल . दांपत्यसुख व वाहनसुख चांगले मिळेल . तब्बेत आणि मनःस्वास्थ्य चांगले राहील . मित्रांसोबत सहलीला जाल . श्रीगणेशाचा आपणांस आशीर्वाद आहे .
वृश्चिक :-
आज आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल . शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल . कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्याने अनेक कामे हाता वेगळी कराल . अपूर्ण कामे तडीस जातील . श्रीलक्ष्मीच्या कृपेने मर्यादित खर्च आपला ताण वाढविणार नाही असे श्रीगणेश सांगतात .
धनु :-
यात्रा- प्रवासाचा बेत स्थगित ठेवा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे . कार्यातील अपयश मनात निराशा निर्माण करील आणि त्यामुळे संताप वाढेल . पण हा राग नियंत्रणात ठेवल्याने गोष्टी जास्त चिघळणार नाहीत . पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल . वाद - विवाद किंवा चर्चा यामुळे समस्या निर्माण होईल . संततीची काळजी वाटेल . पण प्रेमिकांना मात्र रोमान्स आणि धनप्राप्तीसाठी अनुकूल दिवस आहे .
मकर :-
प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असा इशारा श्रीगणेश देतात . घरगुती क्लेश मनाला यातना देतील . आईची तब्बेत मनात चिंता उत्पन्न करेल . सार्वजनिक जीवनात अपयश , अपकीर्ती होईल किंवा मान - प्रतिष्ठेची हानी होईल . पुरेशी विश्रांती आणि झोप न मिळाल्याने तब्बेत बिघडेल . उत्साह आणि स्फूर्ती राहणार नाही . स्त्रू वर्गाकडून नुकसानीची भीती .
कुंभ :-
श्रीगणेश सांगतात की आज आपले मन मोकळेपणा अनुभवेल . शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल . शेजारी आणि भावंडांशी अधिक मेळ जमेल . स्नेहीजन घरी आल्याने आनंद वाटेल . प्रवासाची शक्यता आहे .
मीन :-
जादा खर्च , संताप आणि जीभ यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात . कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे . आर्थिक व्यवहार आणि पैशाची देव - घेव याविषयी सावध राहा . घरातील लोकांशी भांडण होईल . नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील . ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.खाण्या - पिण्याच्या बेपर्वाहीमुळे तब्बेत खराब होण्याची शक्यता आहे .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा