गांजेगाव येथील वीज पडून मृत्यू पावलेल्या पुंजाराम वाडेकर यांच्या कुटुंबीयांना आमदार ससाने यांनी केला चार लाखांचा चेक सुपूर्द - दैनिक शिवस्वराज्य

गांजेगाव येथील वीज पडून मृत्यू पावलेल्या पुंजाराम वाडेकर यांच्या कुटुंबीयांना आमदार ससाने यांनी केला चार लाखांचा चेक सुपूर्द




 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर


यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथील पुंजाराम तुकाराम वाडेकर हे अरविंद सूर्यवंशी यांचे शेतात टिन शेडचे काम करण्यासाठी मजुरी ने गेले होते. दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला, आणि अंदाजे ४.४५ वाजता पुंजाराम वाडेकर यांचे अंगावर वीज पडून ते जागीच मयत झाले होते. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ पसरली.
 जर एखादी व्यक्ती नैसर्गिक संकटामुळे आकस्मिक मृत्यू पावली तर शासनाकडून आकस्मिक मृत्यू निधी हा २४ तासात त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबास भेटतो. पण सध्या कोरोणाच्या भयावह परिस्थिती मुळे म्हणा किंवा शासनाकडे पैसा उपलब्ध नसल्यामुळे, अशा कारणांमुळे मिळणारा चार लाखांचा धनादेश उशिरा का होईना, उमरखेड महागाव विधानसभेचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष, आमदार जनसेवक नामदेवराव ससाने यांनी, सदर प्रकरणात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून खेचून आणला. व आज दिनांक १ जुलै रोजी तो चार लाखांचा धनादेश मयत पुंजाराम वाडेकर यांच्या पत्नी सत्वशीला वाडेकर यांच्या हाती सुपूर्द केला.
 याप्रसंगी उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर, रोहित वर्मा भाजपा शहराध्यक्ष ढाणकी, महेश पिंपरवार भाजपा तालुका उपाध्यक्ष, संजय सल्लेवाड अध्यक्ष ढाणकी शहर पत्रकार संघ, सामाजिक कार्यकर्ते देवराव दिवशे, अनिल कांबळे पो.पा. सावळेश्वर, सौ. सागर झुकझुके उपसरपंच गांजेगांव,विजय रेघाटे, विष्णू वाडेकर यासह गावातील जेष्ठ मंडळी उपस्थित होती. तेव्हा आमदार ससाणे यांनी गावकऱ्यांशी मुक्त संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काही दिवसांपूर्वीच सर्पदंशाने मृत्यू पावलेली प्रतिक्षा राऊत(१८) यांच्या घरी भेट देऊन, त्यांचे कुटुंबाचे सांत्वन आमदारांनी केले. व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करा मी शासनाकडून तुम्हाला योग्य ती मदत मिळवून देईल असे आश्वासन सुद्धा दिले. आमदाराच्या प्रत्यक्ष भेटीने गावकरी सुखावले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads