महाराष्ट्र
मंगळवेढा पोलिसांना सोळा लाखाचा गुटखा पकडण्यात यश
सलिम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा. कर्नाटक राज्यातुन आले ला मंगळवेढा मार्गे इचलकरंजी ला जाणारा अवैधरित्या टेंपोतून जाणारा 16लाख 20 हजार किमतीचा गुटखा मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व त्यांच्या पथकाने पहाटे पाच वाजता पकडले.
गुटखा वाहतूक करणारे टेम्पो एम एच 11 बी एल 3358 हे टेम्पो मंगळवेढ्याच्या दिशेने येत असताना शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून पकडण्यात आला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता, टेम्पोच्या मागे मिनरल पाण्याचे बॉक्स एक लाईन व त्याच्या पुढील भागात बॉक्समध्ये आर एम डी पान मसाला 1000 पाकिटे व सुगंधी तंबाखु 1000 पाकिटे असा 10 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले. वाहन चालक फजल सरदार मोमीन (वय 30) व त्यांच्या सोबत असणारे अमोल आप्पासो शिंदे (वय 20) दोघे रा इचलकरंजी राजेश पांडव (हातकणंगले) बाबासो अण्णा कांबळे वाहन मालक (रा .गोंदवले जिल्हा सातारा )यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा