स्पर्धक क्रमांक ००४५ : गिरीजा उमेश पाटील सातारा - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००४५ : गिरीजा उमेश पाटील सातारा

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... गिरीजा उमेश पाटील

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

गिरीजा उमेश पाटील


निबंधाचा विषय : छत्रपती शिवाजी महाराज 

"माझ्या मराठी मातीचा, 
लावा ललाटास टिळा. 
हिच्या संगाने जागल्या, 
दऱ्याखोऱ्यातील शिला. 
हिच्या कुशीत जन्मले, 
हिरे  - माणिक मोती. 
ज्याच्या तेजस्वी कर्तव्याने, 
साकारिले स्वप्न स्वराज्याचे." 
  अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत ,स्फुर्तीस्थान असणारे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना वंदन करून मी निबंधाचा श्री गणेशा करते. 
  शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील 'शिवनेरी' गडावर फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१,१९फेब्रुवारी १६३० रोजी जिजाबाई  मातेच्या उदरी झाला." शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी " या वचनाप्रमाणे शहाजीराजे या सत्त्वसंपन्न विशुद्ध आणि चारित्र्यशील बीजापोटी हे नररत्न जन्मास आले. .शिवनेरी गडावरील 'शिवाई' या देवीमुळे महाराजांचे नाव 'शिवाजी' असे ठेवण्यात आले.शिवराय ,शिवबा, राजे अशा अनेक नावांनी ते ओळखले जात होते .त्यांचा जन्मदिवस 'शिवजयंती' म्हणून साजरा केला जातो.
    जिजामाता, दादोजी कोंडदेव  व सहकाऱ्यांसमवेत शिवरायांना दांडपट्टा, तलवारबाजी, भाला गजारोहन, तिरंदाजी, कुस्ती यांचे प्रशिक्षण मिळाले होते. वयाच्या १० व्या वर्षी म्हणजेच १६४० मध्ये शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई यांच्याशी झाला. 
.    वयाच्या १४ व्या वर्षी शहाजी महाराजांनी शिवरायांना पुण्याची जहागीर सुपूर्त केली. त्या काळात शिवरायांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाऊवर होती .जिजाऊंनी शिवरायांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगून संस्कार घडविले. त्यांनी शिवरायांना धैर्याची, कर्तृत्वाची जाणीव करून दिली .हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानीमनी स्वप्नी दिसत. हे वीर  अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे ,दुष्टांचा नाश करून प्रजेला सुखी करावे ,न्यायी व्हावे,धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना नेहमी वाटे.स्वाभिमानाचे स्फुल्लिंग बाल शिवाजीच्या मनात फुलवले ते त्यांच्या आईने - जिजाऊने!
 "निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारु ll
 अखंडस्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी ll "
   वयाच्या १५व्या वर्षी सण १६४५ मध्ये शिवरायांनी काही मावळ्यांसमवेत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. 'तोरणागड'  जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. 'स्वराज्य,स्वधर्म,स्वभाषा' यांच्या उत्कर्षासाठी आयुष्यभर झगडले. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत यासाठी त्यांनी 'राज्यव्यवहारकोश' तयार केला. तसेच स्वतःची राजमुद्रा तयार केली. 
       स्वराज्य निर्मितीच्या काळात शिवाजी महाराजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले परंतु न डगमगता त्यांनी हिंदवी स्वराज्याचा लढा चालूच ठेवला. अफजलखान वध, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट, शाहिस्तेखानाची फजिती या सर्व रोमांचकारी गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या. 
     या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व दिसून येते. शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर त्यांनी सामर्थ्यशाली राज्य उभे केले. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले.
" प्रधान अमात्य सचिव  मंत्री,
 सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री, 
सेनापती त्यात असे सुजाण, 
अष्टप्रधानी शिवमुख्य राणा" 
       अष्टप्रधान मंडळात योग्य लोकांची नेमणूक करून त्यांना मंडळाची पदे देऊन राज्यकारभार सुरळीत चालवला. 
    ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. पंडित गागा भट्टानी राज्याभिषेकाचा विधी पार पाडला. या राज्याभिषेकात शिवरायांचा 'छत्रपती, क्षत्रिय, कुलावतंस, हिंदू धर्म धारक, शककर्ते या नावांनी गौरव करण्यात आला. 
       शिवरायांनी कोणत्याही एका जातीचे अथवा धर्माचे नेतृत्व केले नाही. सर्व जाती धर्माचे नेतृत्व केले. सर्व धर्मांना समानतेची वागणूक देणारे राजा शिवाजी हे पहिले राज्यकर्ते होय. सामान्यातील सामान्य माणसाचे, विशेषत: गोरगरीब जनतेचे कल्याण व संरक्षण हे त्यांच्या प्रशासनाचे मुख्य सूत्र असल्याने हिंदुस्थानच्या इतिहासात 'रयतेचा राजा' म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. 'रयत म्हणजे सामान्य शेतकरी वर्ग.' हा शिवकालीन समाजाचा कणा होता. या वर्गाचे कल्याण म्हणजे स्वराज्याचे कल्याण याची शिवछत्रपतींना अचूक जाण होती.  स्वाभाविकच, 'रयतेचे कल्याण' हे त्यांच्या  प्रशासनाचे मुख्य ध्येय धोरण बनले. 
      शिवरायांचे मोठेपण अफजलखान व त्याच्या प्रचंड सैन्याला गारद करणे, पन्हाळगडावरून सुटका करून घेणे, विशाळगडचा विशालवेढा मोडून काढणे, शाहिस्तेखानाला धडा शिकविणे; या सर्व घटनांतून दिसून येते. लौकिक पराक्रमापेक्षा अलौकिक पराक्रम बलिदानाची प्रेरणा देतो. 'शिवा काशिद' याच्या सारखा नाभिक समाजातील सामान्य तरुण जाणीवपूर्वक आत्म बलिदानासाठी तयार होतो तेव्हाच राजे पन्हाळगडावरून सुटू शकतात. 'बाजीप्रभू देशपांडे' तीनशे मावळ्यांसह 'घोडखिंड' अखेरच्या श्वासापर्यंत लढवतो तेव्हाच ती 'पावनखिंड' होते आणि राजे गडावर सुखरूप पोहोचतात. तानाजी मालुसरे सारखा मावळा 'आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे' अशी प्रतिज्ञा करतो आणि सिंहासारखा लढतो तेव्हाच गड काबीज होतो. अशा वेळेस महाराज हळहळतात. 'गड आला पण सिंह गेला' असे अनेक मावळ्यांचे बलिदान शिवरायांच्या इतिहासात पावलोपावली आपणास पाहायला मिळते.
    शिवाजी महाराजांनी स्त्री स्वातंत्र्याला नेहमी प्रोत्साहन दिले. स्त्रियांचा नेहमी आदर सन्मान केला. परस्त्रीला मातेप्रमाणे मानले. स्त्रियांवर, जनतेवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली. 
      गनिमी काव्याचा  उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. या तंत्राचा वापर करताना त्यांना सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले व प्रजेचा पूर्ण पाठिंबा मिळाला. शिवाजी महाराजांनी वनदुर्ग,गिरिदुर्ग व जलदुर्ग हे तीन प्रकारचे किल्ले बांधून लोकांमध्ये देशप्रेम व आत्मविश्वास निर्माण केला. शिवरायांनी इंग्रज, सिद्धी व पोर्तुगीज यांना दरारा वाटावा असे भक्कम आरमार उभारले. शिवाजीराजांना 'भारतीय आरमाराचे जनक' म्हटले जाते. 
        शिवरायांनी स्वराज्यात कधीही कोणताही भेदभाव केला नाही. संतांचा, विद्वानांचा सत्कार केला  मंदिर व मशिदींचे रक्षण केले. पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले. राजे युगपुरुष होते. गुणांची उत्तम जाण असलेल्या या राजाजवळ सर्व गुण संग्राहकता  होती. त्यांनीच महाराष्ट्रात प्रथम स्वातंत्र्याचे बीज पेरले, मराठ्यांतील पराक्रमाचे स्फुल्लिंग चेतवले, महाराष्ट्राची अस्मिता फुलवली व असाध्य वाटणारे आपले स्वराज्याचे स्वप्न साकार केले. 
"हा राकट देश मराठा, 
नररत्नांची खाण! 
इथेच लढले सत्यासाठी, 
शिवरायांचे प्राण!" 
      मातृभूमीची परकीय अमलांपासून  मुक्तता म्हणजेच हिंदवी स्वराज्य स्थापना हे छत्रपतींचे जीवनकार्य होते. या कार्यसिद्धीसाठी त्यांनी हयातभर अविरत कष्ट घेतले. 
"गतीचा संदेश तू, अन् क्रांतीचा आदेश तू, 
संस्कृतीचा मान तू, अन् आमुचा अभिमान तू" 
      ज्याच्या चरणी सर्व मानवजात नतमस्तक होते असा हा जाणता राजा, आदर्श पुत्र, कुशल संघटक, रयतेचा वाली, दुर्जनांचा कर्दनकाळ व सज्जनांचा कैवारी, श्रीमंतयोगी, थोर राष्ट्रपुरुष 3 एप्रिल, १६८०रोजी जनतेला दुःख सागरात लोटून आजारपणामुळे रायगडावर अनंतात विलीन झाला.
      अशा या श्रीपती, भूपती, नृपती, अधिपती, पृथ्वीपती, छत्रपती-कुलवंत, जयवंत, यशवंत, कीर्तीवंत, धैर्यशील, सतशील, धर्मशील, प्रजादक्ष, सिंहासनाधीश, महाराजाधिराज, श्री. छत्रपती शिवरायांच्या चरणी माझा मानाचा मुजरा! 
'जय जिजाऊ, जय शिवराय!'
Previous article
Next article

31 Comments to

  1. खूप सुंदर लेख आहे,वाचून आनंद झाला.

    उत्तर द्याहटवा
  2. गिरीजा सुंदर लेख आहे, वाचून आनंद झाला.
    'जय जिजाऊ, जय शिवराय!'

    उत्तर द्याहटवा
  3. खूप काही लिहीले आहे तुम्ही AII THE BEST हिच शुभेच्छा तुम्हाला

    उत्तर द्याहटवा
  4. गिरीजा खुप सुंदर निबंध लिहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खुप छान तुझा मणी विचार आहेत आणि ते अतिशय सुंदर रित्या लेख लिहिला आहेस तूच पहिली येणार ह्याच माझा शुभेच्या

    उत्तर द्याहटवा
  5. Khup chan Girija Chhatrapati Shivaji Maharaj yancha bddl khup apratim mahiti ahe khup chan ....all the best

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान लिहिला आहेस निबंध गिरीजा.... जय जिजाऊ, जय शिवराय.

    उत्तर द्याहटवा
  7. Very nice article Girija.खुप छान लिहिले आहेस,
    🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

    उत्तर द्याहटवा
  8. AM
    Very nice essey Girija.खुप छान लिहिले आहेस,
    🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads