महाराष्ट्र
ओबीस क्रांति मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन
प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-
भंडारा मध्ये ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी जनजागृती करणारी ओबीसी क्रांती मोर्चा ने जिल्ह्यातच नव्हे राज्यभरातील प्रश्नांना हात घातला आहे अशा ओबीसी क्रांती मोर्चाच्या केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन भंडारा शहरात पार पडले.
ओबीसी समाजबांधवांची स्वतंत्र जनगणना व्हावी, शासकीय नोकरीत ओबीसींच्या वाटा कायम ठेवावा, ओबीसींच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्कॉलरशिप मिळावे यासह ओबीसी बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते हे मागील कित्येक वर्षांपासून शासनाशी लढा देत आहेत. अशा या ओबीसी क्रांती मोर्चाचे हक्काचे कार्यालय भंडारा शहरात सुरू करण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिला शहराध्यक्ष शोभा बावनकर यांनी सढळ हाताने मदत केली.
राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद मार्गावर डॉ. रंगारी हॉस्पिटल समोर बावनकर यांच्या घरी कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे शोभा बावनकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी त्यांच्या स्वमालकीच्या घरी ओबीसी क्रांती मोर्चाला मोफत कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन शोभा बावनकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा चे मुख्य संयोजक संजय मते संयोजक जीवन भजनकर,भाऊ कातोरे, अमर भुरे, गोवर्धन साकुरे, संदीप मारबते, नेहाल भुरे, पुरुषोत्तम नंदुरकर, उमेश मोहतुरे, हिवराज वंजारी , गणेश शेन्डे, शत्रुगन लिचडे, शोभाताई बावनकर , श्वेता बावनकर, रेश्मा पारसडे, कल्पना नवखरे, कल्पना चांदेवार, शंकुतला गभने, मीना कांबळे , विद्या मदनकर. आदी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा