दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२ मी... अंकिता अशोक कदम
सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...
स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे...
आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....
स्पर्धेची बक्षिसे :-
प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त
द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त
तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त
चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त
पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त
सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी
अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी
तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.
प्रवेश फी :- १५० रुपये फक्त
Whatsapp क्रमांक :- 8007613469
आपला नम्र
अंकिता अशोक कदम
निबंधाचा विषय :- छत्रपती शिवाजी महाराज
" जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा "
या राजा बढे यांच्या गीतातून 'महाराष्ट्र 'राज्य वर्णिले आहे. असा महाराष्ट्र जो सुमारे साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होऊन हिंदवी स्वराज्यात सुखा-समाधानाने ,शांतीने जगू लागला . हा जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे सर्वज्ञात हिंदवी स्वराज्य संस्थापक " छत्रपती शिवाजी महाराज".
साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.
अशा या महापुरुषाचा शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच ईंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. 'क्रांती नेहमी अंधारातच जन्माला येते' या वाक्याप्रमाणे शिवरायांचा जन्म हा रात्रीच्या वेळचा . त्यांचे नाव शिवबा , आई जिजाबाई व वडिल शहाजीराजे . त्यांचे बालपण अगदी संस्कारक्षम .आईची माया , प्रेम ,उत्तम शिक्षण , शूर पुरुषांच्या गोष्टी , संतांचे अभंग या सगळ्या गोष्टी ऐकत , अनुभवत शिवराय मोठे होत असताना त्यांच्या मनात आदरबुद्धी निर्माण झाली. दरम्यान विविध विद्या आणि कला यांचा परिचय त्यांना झाला. अगदी वयाच्या १२ व्या वर्षी शत्रुशी दोन हात कसे करायचे , राज्यकारभार कसा करावा इ. कला त्यांना अवगत होत्या. शिवाजी हेच या भागाचे बालराजे आहेत, अशी सर्वांची खात्री झाली.
या सगळ्याच्या मागे होत्या जिजाबाई, शिवरायांची आई. कदाचित त्यामुळेच आज 'सुंदर महाराष्ट्र ' आपणास पाहायला मिळत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो याचे उत्तम उदाहरण "राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज."
१६४५ च्या मार्च महिन्यात शिवबा व त्यांच्या निष्ठावान सवंगड्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. "ज्याचे किल्ले त्याचे राज्य" असे म्हणत शिवरायांनी स्वराज्यासाठी प्रचंडगड , राजगड, रायगड , प्रतापगड ,पन्हाळगड इ. अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यासाठी त्यांना अनेक संकटांशी लढावे लागले. गनिमी काव्याची पद्धत वापरुन आदिलशाही , निजामशाही आणि मुघलशाही यांच्याशी लढा दिला. शाहिस्तेखान , अफजलखान , दिल्लीचा अौरंगजेब यांनाही लढा दिला.योग्य त्यावेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र हुशारीने वापरुन अनेक शत्रूंना नामोहरम तर केलेच त्याचबरोबर फितुरी , दगाबाजी, स्वराज्यातंर्गत कलहाचाही सामना केला. आपले बुद्धीचातुर्य वापरुन अनेक समस्या सोडवल्या.
सामान्य रयतेची व्यवस्था,शेतकर्यांची व्यवस्था , लढवय्या शूर सरदाराची व्यवस्था अशा अनेक व्यवस्था राजेंनी लावून दिल्या. त्यांनी धर्मद्वेष कधीच केला नाही. रामायण -महाभारताप्रमाणे 'कुराण' या धर्मग्रंथाचा ही आदर केला.परस्त्री मातेसमान मानून स्रियांचा सन्मान केला . खचलेल्या ,अन्यायात पिचलेल्या मनामध्ये स्वाभिमानाचा,पराक्रमाचा स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागरुक केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांनी अष्टप्रधानमंडळाची स्थापना करुन हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली. राजभाषा विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला.
ही स्वराज्याची नौका बांधत असताना तानाजी मालुसरे ,बाजीप्रभू देशपांडे ,शिवा काशीद, जीवा महाला इ.अशा अनेक वीरांनी शिवरायांसाठी प्राणाचे बलिदान दिले.
" लाख मेले तरी चालतील; पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे", या शब्दांत शिवरायांप्रती वीरांकडून भावना व्यक्त होत होत्या. याच साथीदारांच्या सोबतीने स्वराज्य उभे राहिले. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला समजायला हवे यासाठी शिवरायांनी गागाभट्ट यांच्याकडून १६७४ मध्ये राज्यभिषेक करुन घेतला .राज्याभिषेक झाला तो केवळ स्वराज्य भक्कम करण्यासाठी.
अशा या शिवरायांच्या ठायी शौर्य , पराक्रम ,शारिरीक सक्षमता,ध्येयवाद ,कुशल संघटन ,कडक व नियोजनबद्ध प्रशासन ,मुत्सद्दीपणा ,धाडस इ. असे अनेक गुण वास करत होते. प्रत्येकाचे दु:ख जाणून घेणारे "जाणता राजा" होते. अशा या महापुरुषास त्रिवार वंदन.
एक विचार समतेचा
एक विचार नितीचा
ना धर्माचा , ना जतीचा
माझा राजा फक्त मातीचा.
धन्यवाद !!
. सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाThank u
हटवाThanks
हटवाछान
उत्तर द्याहटवाअतिशय मोजक्या आणि सुलभ शब्दांत सुंदर वर्णन.... मस्त Keep It up
उत्तर द्याहटवाChaaan
उत्तर द्याहटवाखुप छान वर्णन ..
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाBest👍
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट
उत्तर द्याहटवाखुप छान मोजक्या शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहीती दिली.
उत्तर द्याहटवाखूप छान मॅडम👍👌
उत्तर द्याहटवाThanks
हटवाChaan
उत्तर द्याहटवाखूप छान 👍👍
उत्तर द्याहटवाBest ,👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाGreat������
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाCarry on
उत्तर द्याहटवा